Vogue Horoscope Today: लोकांमध्ये या काही दिवसांत एकच चर्चा ऐकू येते भाऊ, गुरु अस्त होणार म्हणे, आपल्यावर परिणाम होईल का? खरं सांगायचं तर 2026 चं वर्ष काही साधं नसणार आहे. आकाशात गुरु म्हणजेच बृहस्पति सूर्याच्या अधिक जवळ जातील आणि तब्बल 28 दिवस ‘अस्त’ राहतील. ज्योतिषशास्त्रात ही अवस्था खूप महत्वाची मानली जाते कारण अशा काळात काही राशींचं भाग्य अक्षरशः जागं होतं. अनेकांच्या करिअरचा रस्ता खुला होतो, घरात शांतता, पैशांची उब, आणि मनालाही एक वेगळंच समाधान देणारी स्थिरता मिळते. आता या गुरु अस्ताच्या काळात तीन राशींवर खास कृपा होणार आहे मेष, कर्क आणि कन्या. या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ आयुष्यात नवं वळण घेऊन येऊ शकतो. Vogue Horoscope Today
ज्योतिषात गुरु ग्रहाला भाग्याचा स्वामी म्हटलं जातं. कुणाच्या कुंडलीत गुरु मजबूत असेल तर त्या व्यक्तीला मान–प्रतिष्ठा, शिक्षणात यश, चांगला निर्णय, संतान सुख, घरातील समाधान आणि आर्थिक प्रसन्नता मिळत जाते. पण गुरु कमजोर असेल तर अडथळे, शिक्षणात खंड, पैशांचा तुटवडा आणि कौटुंबिक तणाव… अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणूनच 2026च्या जुलै–ऑगस्टमधला हा 28 दिवसांचा गुरु अस्त काळ खूप लोकोपयोगी ठरणार आहे, विशेषतः त्या तीन राशींसाठी ज्यांच्यावर त्याची थेट कृपा पडणार आहे.
मेष राशी (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अगदी घरच्या वातावरणासारखा आराम आणि समाधान घेऊन येईल. अनेक दिवस मनावर असलेली जबाबदारी, संततीबाबतची प्रतीक्षा या सर्व गोष्टींना सकारात्मक दिशा मिळेल. घरात छोट्या–मोठ्या आनंदाची चाहूल लागेल. काही जणांना घर सजवण्याचा, नवे सामान घेण्याचा मनसुबा पूर्ण करता येईल. दांपत्य जीवनात गोडी वाढेल आणि पैशांचा ओघही वाढेल. ज्या गोष्टीकडे तुम्ही खूप दिवसांपासून दुर्लक्ष करत होतात, त्या आता नैसर्गिकपणे पूर्ण होतील.
कर्क राशी (Cancer): कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु म्हणजे थेट मनात उजेड भरणारा ग्रह. या लोकांवरही गुरुजींची माया चांगलीच पडताना दिसेल. आरोग्याच्या तक्रारी, विशेषतः त्वचेचे विकार, हळूहळू कमी होतील. करिअर असो वा व्यवसाय दोन्हीठिकाणी वाढ आणि लोकांकडून अपेक्षित सन्मान मिळेल. प्रेमसंबंधात आनंद येईल, नात्यांमध्ये जवळीक वाढेल. पैसे अडकले असतील तर मार्ग सुटतील. कर्जाचा भार कमी होईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवी संधी घेऊन येईल.
कन्या राशी(Virgo): कन्या राशीच्या लोकांना या काळात एक वेगळीच ऊर्जा मिळेल. नव्या लोकांशी भेट होईल, त्यातून काही महत्त्वाच्या संधी हाताशी येतील. मनात असलेली भीती, संकोच निघून जाऊन आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी बढती, वेतनवाढ असे चांगले बदल घडू शकतात. व्यावसायिकांना तर हा काळ भरभराटीचा.मित्रांसोबत छोटासा प्रवास घडू शकतो. प्रेमात आणि वैवाहिक जीवनात शांतता आणि एकमेकांबद्दलची समज वाढेल. बँक बॅलन्सही स्थिर वाढत राहील. 2026 च्या या गुरु अस्त काळातून या तीन राशींसाठी जे लाभ येणार आहेत, ते काही सामान्य नाहीत. ज्योतिषाचा हेतू फक्त अंदाज देणं नाही; तर मनाला तयारी देणं आहे. आणि या तीन राशींनी मात्र 2026 ला स्वागतासाठी मन मोकळं ठेवलं पाहिजे, कारण भाग्य खरंच दारावर येऊन उभं राहणार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती किंवा माहिती करिता आहे कुठलाही दावा करत नाही. मी आम्ही अंधश्रद्धेला दुजारा देत नाही.)