PM Kisan 22वा हप्ता थांबलाय! लाखो शेतकऱ्यांना धक्का या छोट्या चुका केल्या तर 2000 रुपये कधीच येणार नाहीत!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 22nd Installment | देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतीचा हंगाम, खत, बियाणं, घरखर्च… अशा सगळ्या गरजा भागवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. अशातच सरकारकडून दर चार महिन्यांनी मिळणारे दोन हजार रुपये अनेक शेतकरी मंडळींना मोठा दिलासा देतात. पण यावेळी मात्र काहींच्या खात्यात २२वा हप्ता जमा होणार नाही, हे ऐकून अनेक शेतकरी हादरले आहेत. त्यांना आपली चूक काय झाली हेही समजलं नाही.

धाराशिव जिल्ह्यात तर तब्बल २५८८ शेतकरी PM किसान योजनेतून वगळल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. मग प्रश्न एकच  नेमकं असं काय होतंय की शेतकऱ्यांचे पैसे अडकत आहेत?

कोणत्या चुकीमुळे २२वा हप्ता रखडतोय?

सरकारकडून PM किसानचा प्रत्येक हप्ता DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट खात्यात पाठवला जातो. पण खात्यात DBT सक्रिय नसेल तर 2000 रु. तुमच्या नजरेसमोरून निसटतात आणि खाते रिकामंच राहतं.

अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काय होतं?

त्यांचं आधार बँकेशी लिंक नसतं, DBT सुरू नसतो, मोबाईल नंबर अपडेट नसतो… आणि मग सिस्टम हप्ता पुढे ढकलते. शेतकरी मात्र बिचारे सरकारी साइटवर वारंवार तपासत बसतात की “कधी येणार हप्ता?”

DBT ऑन नाही? मग 22वा हप्ता येणारच नाही!

सरकार स्पष्ट सांगते

👉 आधार-बँक लिंक नसल्यास

👉 DBT सुरू नसल्यास

👉 NPCI mapper वर खाते मॅप नसल्यास

हप्ता खात्यात जमा होणार नाही.

येताना पैसा अडकल्याचं कारणही कळत नाही. बँकेकडे चौकशी केली तर सांगितलं जातं

“DBT सुरू नाही, आधार mismatch आहे, खाते NPCI वर अपडेट नाही…”

म्हणजे छोटीशी चूक… आणि 2000 रुपये बोंबलले!

DBT कसं सुरू कराल? (सोप्या भाषेत)

शेतकरी बांधवांनो, तुमचा हक्काचा पैसा अडकू नये म्हणून हे चार पायऱ्या करून टाका:

१️⃣ बँकेत जा

PM किसान हप्ता ज्या खात्यात येतो त्या बँकेच्या शाखेत जा.

२️⃣ दोन फॉर्म भरा

DBT संमती फॉर्म

आधार सीडिंग फॉर्म

फॉर्म बँकेत मिळतात.

३️⃣ आधार लिंक करून घ्या

आधार कार्डची झेरॉक्स व पासबुक बरोबर घ्या. बँक तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करेल.

४️⃣ मोबाईल नंबर अपडेट करा

यामुळे व्यवहाराचे SMS येतील आणि पैसे आले की लगेच कळेल.

५️⃣ बँक तुमचं खाते NPCI mapper शी लिंक करेल

ही सर्वात महत्त्वाची पायरी!

यामुळे सर्व सरकारी DBT जसे PM किसान, खत अनुदान, PMUY वगैरे थेट खात्यात येतील.

शेवटी…

शेतकरी कधीच सरकारी दारात उंबऱ्यावर तासन् तास रेंगाळायला तयार नसतो. त्याला फक्त त्याच्या हक्काचा पैसा वेळेवर मिळावा, एवढीच अपेक्षा असते. २२व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्यांनी या छोट्या पण महत्त्वाच्या चुका ताबडतोब तपासून दुरुस्त कराव्यात. नाहीतर सिस्टमच्या एका ‘टिक’मुळे तुमचा संपूर्ण हक्काचा हप्ता थांबू शकतो.

Leave a Comment