Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत बसल्या आहेत. “७ डिसेंबरपर्यंत येईल” अशी चर्चा जोरात होती. पण आज ८-९ दिवस उलटून गेले तरीही खात्यावर काहीच जमा न होता बहिणींच्या कपाळावर आठ्या चढल्या आहेत. दरम्यान राज्यात कधीही महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आता सरकारकडून निवडणुकांपूर्वीच दोन महिन्यांचा रक्कम म्हणजे ३००० रुपये थेट खात्यावर जमा करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नोव्हेंबरचा हप्ता थांबण्यामागे कारण काय?
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवायसी प्रक्रियेच्या अडचणीमुळे अनेकांच्या खात्यावर रक्कम पाठवता आली नाही. अनेक बहिणींचे ई-केवायसी पूर्ण झाले नाही, म्हणून पैसे रोखून ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. Mazi Ladki Bahin Yojana
डिसेंबरमध्ये १७वा हप्ता, पण अजूनही शांतता
डिसेंबरमध्ये येणारा १७वा हप्ता (नोव्हेंबरचा) अजूनही थांबलेलाच आहे. आठवडा उलटूनही सरकारने एकही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता नोव्हेंबर + डिसेंबर, दोन्ही महिन्यांचा निधी म्हणजे थेट ३००० रुपये बहिणींच्या खात्यावर एकदम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आणि हप्त्याची राजकारणातली गुंतवणूक
१५ डिसेंबरनंतर राज्यातील २९ महापालिकांचा धुरळा उठू शकतो. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना समाधान व्हावं आणि मतदानावरही परिणाम व्हावा, म्हणूनच हा निधी थेट खात्यात टाकण्याचा ‘डाव’ सरकारकडून खेळला जातोय अशी राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु आहे. ग्रामीण भागात या योजनेचा प्रभाव प्रचंड असल्यामुळे सरकारसाठी हा ‘मोठा तुरुपाचा पत्ता’ ठरू शकतो.
“KYC करणं अनिवार्य” – आदिती तटकरेंची स्पष्ट सूचना
महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ३१ डिसेंबरपूर्वी सर्वांनी ई-केवायसी पूर्ण करायलंच हवं, नाहीतर हप्ता थांबू शकतो. म्हणजेच, ज्यांनी KYC केले आहे त्यांनाच पुढचे पैसे खात्यावर दिसतील. त्यामुळे बहिणींनी आपले दस्तऐवज वेळेत करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कधी येणार पैसे?
महिलांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न—“नेमके पैसे कधी?” विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्यांचे पैसे एकदम जमा करण्याची तयारी आहे. मात्र सध्या स्थानिक निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकार जपून पावले उचलत आहे.
बहिणींनी आता काय करावे?
- ई-केवायसी तातडीने पूर्ण करा
- बँकेतील मोबाइल नंबर सक्रिय ठेवा
- संदेश येताच खाते तपासा
- कोणीही अतिरिक्त शुल्क मागत असल्यास सावध रहा
बहिणींच्या आशा आणि सरकारची परीक्षा…
गेल्या काही महिन्यांत अनेक महिलांनी या योजनेमुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार यामध्ये दिलासा मिळाल्याचं सांगितलं. आता दोन हप्त्यांची एकत्र रक्कम मिळाली तर बऱ्याच कुटुंबांना थोडासा आर्थिक श्वास मिळेल. पण हा लाभ खरोखरच लोककल्याणासाठी आहे की निवडणूक साधण्यासाठी? हा प्रश्न मात्र अजूनही अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.
सरकारचा निर्णय काहीही असो, हजारो बहिणींच्या आयुष्यात या १५०० रुपयांनी खरा दिलासा मिळतो – हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल, पण आत्ता तरी प्रत्येक बहिणीच्या नजरा बँक खात्याकडेच लागलेल्या आहेत…