नमो शेतकरी योजनेतून 6 लाख शेतकरी अपात्र? यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आजची सकाळ थोडी चिंतेची ठरली आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी !Namo Shetkari Yojana) योजनेशी जोडलेली एक गंभीर अपडेट बाहेर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम (pm Kisan) किसान योजनेच्या २१व्या हप्त्यासाठी राज्यातील ६ लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले, अशी बातमी समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अरे आपलं नावही काढलं असेल का? पुढचा नमोचा हप्ता थांबणार तर नाही ना? अशा चर्चा आज गावोगावी सुरू झालेल्या दिसत आहेत.

शेतकरी वर्षभर शेतीत जीव ओततात. सध्या खरीप नुकतंच भरात आलंय, काही भागात अतिवृष्टीने वादळांनी हाहाकार माजवला आहे. अशात सरकारकडून मिळणारा हा छोटा आर्थिक आधारही थांबला, तर परिस्थिती अधिक बिकट होते. म्हणूनच या बातमीबद्दल शेतकरी जास्तच संवेदनशील झाले आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजना म्हणजे काय? (What is Namo Shetkari Maha sanman Yojana?)

राज्यातील शेतकऱ्यांच्या हाताला आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०२४ साली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली.

ही योजना म्हणजे पीएम किसानचीच राज्यस्तरीय वाढ. केंद्र सरकारकडून ६,००० आणि राज्य सरकारकडून ६,००० मिळून वर्षाला एकूण १२,००० रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. योजनेच्या सुरुवातीपासूनच लाखो शेतकऱ्यांना दोन-तीन हप्ते मिळाले आणि त्यांनी बियाणं, खते, औषधं, घरातील खर्च यात मोठा दिलासा घेतला. त्यामुळे पुढचा हप्ता मिळेल की नाही, हे जाणून घेण्यासाठी शेतकरी नेहमीच उत्सुक असतात.

नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते मिळाले?

✔ २०२४ च्या मध्यात योजना सुरू

✔ राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ हप्ते वितरित

✔ आठव्या हप्त्याची तयारी प्रशासन स्तरावर सुरू

✔ पैसे थेट DBT ने शेतकऱ्यांच्या खात्यात

पहिल्या पासून सातव्या हप्त्यापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आली नाही. पण आता आलेल्या नव्या अपडेटमुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

मग ६ लाख शेतकरी खरंच अपात्र आहेत का? पुढील ‘नमो’ हप्ता थांबणार का? येथील सर्वात महत्त्वाचा मुद्दा राज्यात ६ लाख शेतकरी थेट नमो योजनेतून अपात्र झालेले नाहीत. ही आकडेवारी पीएम किसान योजनेशी संबंधित आहे.

केंद्राने पीएम किसान योजनेत ई–KYC, आधार–बँक लिंकिंग, जमीन नोंदी, डुप्लिकेट नावं अशा विविध कारणांमुळे काही नावे तात्पुरती अपात्र केली आहेत. पण हे अपात्र होणे म्हणजे नमो शेतकरी योजनेतूनही बाहेर फेकले जाणे नसते. मात्र, काही निकष समान असल्यामुळे काही शेतकऱ्यांना पुढचा नमो हप्ता मिळण्यासाठी कागदपत्रे दुरुस्त करणे आवश्यक होऊ शकते.

मग पुढचा आठवा हप्ता’ कोणाला मिळणार?

सरकारी सूत्रांनुसार आणि आतापर्यंतच्या निकषांनुसार राज्यातील बहुसंख्य पात्र शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळणार आहे. अपात्रतेची बातमी ज्या ६ लाख शेतकऱ्यांबाबत आहे, त्यातले बहुतांश शेतकरी दस्तऐवज दुरुस्ती करून पुन्हा पात्र होऊ शकतात.

✔ ज्यांची ई–KYC पूर्ण आहे

✔ ज्यांचा आधार–बँक लिंक अपडेट आहे

✔ ज्यांची ७/१२ जमीन नोंद व्यवस्थित आहे

✔ ज्यांचे नाव डुप्लिकेट नाही

✔ किंवा ज्यांच्याकडे कोणतीही चुकीची माहिती नाही

या सर्व शेतकऱ्यांना पुढचा नमो हप्ता मिळणार यात शंका नाही.

सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांनी काय करावे?

ज्यांना पुढचा हप्ता थांबेल अशी भीती वाटते त्यांनी खालील गोष्टी तपासून घ्याव्यात :

• PM–Kisan ची ई–KYC पूर्ण झाली आहे का?

• बँक खाते आधारला लिंक आहे का?

• जमिनीची ७/१२ नोंद व्यवस्थित अपडेट आहे का?

• मोबाईल OTP मिळण्यास अडचण येते का?

या पैकी कोणतीही गोष्ट प्रलंबित असेल, तर तत्काळ दुरुस्ती करावी. कारण नमो योजना आणि पीएम किसान दोन्हीमध्ये तुमची माहिती एकमेकांना जुळणे आवश्यक असते.

शेतकऱ्यांनी घाबरू नये

सरकारच्या दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. त्यामुळे कोणतेही नाव जाणीवपूर्वक काढले जात नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या छोट्या-मोठ्या चुका किंवा जुनी माहिती ई–KYC मध्ये न जुळल्यामुळे नाव तात्पुरते अपात्र होते.ही दुरुस्ती करून पुढील हप्ता मिळू शकतो. राज्य सरकार आठव्या हप्त्याबाबत लवकरच अधिकृत सूची जाहीर करणार आहे. तोपर्यंत कोणतीही चुकीची माहिती पसरवू नये.

खालील दिलेल्या व्हिडिओ सविस्तर पहा

Leave a Comment