Edible Oil Price: गेल्या काही महिन्यांपासून घरगुती बजेटचा सर्वात मोठा डोकेदुखी बनलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचे तेल. फोडणीपासून ते भाजीपर्यंत, पोळी-भाकरीपासून ते तळणापर्यंत प्रत्येक जेवणात तेलाचा थेंब लागतोच. पण तेलाचे वाढते भाव पाहून सर्वसामान्य गृहिणींच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता अखेर सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकारचा मोठा निर्णय: कच्च्या खाद्यतेलावरील कस्टम ड्युटीत कपात
केंद्र सरकारने नागरिकांच्या बजेटला हातभार लावण्यासाठी कच्च्या खाद्यतेलावरील Basic Custom Duty 20% वरून थेट 10% पर्यंत कमी केली आहे. हा निर्णय अचानक घेतलेला नसून, महागाईला आळा घालावा या उद्देशाने झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतरच हा पाऊल उचलण्यात आला आहे. या कपातीने शुल्क फरक 8.75% वरून 19.25% पर्यंत वाढला आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना म्हणजेच आपल्यासारख्या रोजच्या वापरकर्त्यांना होणार आहे. सरकारने उद्योग संघटनांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “शुल्क कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे.”
गोड तेल झाले स्वस्त
शासनाच्या अंदाजानुसार, खाद्यतेलाच्या किमती 10% पर्यंत कमी झाली आहे. उदा. – जर एखादे तेल सध्या 150 रुपये प्रति लिटरला मिळत असेल, तर ते जवळपास 135 रुपयांपर्यंत खाली येऊ आले आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. खाद्यतील प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे यामध्ये झालेली घसरण सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच दिलासा देणारे ठरणार आहे. Edible Oil Price
हे पण वाचा| नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे ₹2,000 या तारखेला खात्यात जमा होणार; शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर
देशांतर्गत शुद्धीकरण उद्योगांना चालना
या निर्णयाचा फायदा फक्त ग्राहकांनाच नाही, तर…
- देशांतर्गत रिफायनरींना नवीन बळ
- कच्च्या खाद्यतेलाची मागणी वाढणार
- मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या पामतेलावर काही प्रमाणात नियंत्रण
- देशातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याची शक्यता
केंद्र सरकारची ही रणनीती ग्राहक, उद्योग आणि शेतकरी — तिघांनाही फायदेशीर ठरणारी आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढतात कसे? हेच आहे मूळ गणित
भारतात वापरले जाणारे बहुतांश खाद्यतेल आयात केले जाते. त्यामुळे सीमाशुल्क (Custom Duty) तेलाच्या किमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
ड्युटी कमी झाली की बाजारात तेल स्वस्त उपलब्ध होते आणि नैसर्गिकरित्या किंमती खाली येतात. यावेळी कच्च्या तेलावरील शुल्कात मोठी कपात झाल्याने बाजारात तेलाची उपलब्धता वाढेल, परिणामी येत्या काही दिवसांत/आठवड्यांत भाव घटण्याची शक्यता आहे.
घरगुती बजेटला मोठा दिलासा — गृहिणींचा आनंद ओसंडणार!
स्वयंपाकाच्या तेलाचा खर्च प्रत्येक महिन्याच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतो. तेलाचे भाव कमी झाल्यास:
- घरगुती खर्च कमी होईल
- बचत वाढेल
- महागाईचा ताण कमी होईल
इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस सिलिंडर, भाज्या, धान्य — जवळजवळ सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या असताना खाद्यतेल स्वस्त होणं हा मोठा दिलासा आहे.
एकंदरीत चित्र काय सांगतं?
केंद्र सरकारचा हा निर्णय महागाईवर नियंत्रण आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी पाऊल आहे. पुढील काही दिवसांत बाजारभावात प्रत्यक्ष घट दिसू लागली की त्याचा फायदा थेट तुमच्या जेवणाच्या ताटात आणि पाकिटात जाणवेल. तुम्हाला काय वाटतं? सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा…