LIC Retirement Scheme | आजच्या या धावत्या काळामध्ये मासिक पगारातून काही रक्कम बाजूला ठेवून कुठेतरी सुरक्षित गुंतवणूक करण्यात ही सवय अनेकांनी लागलेली आहे. आयुष्य चालवताना जेव्हा हातात महिन्याला पगार नसतो तेव्हा या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला होतो. सध्या अशीच एक योजना चर्चेमध्ये आहे, ही योजना LIC दोरा चारवली जात आहे या योजनेचे नाव जीवन शांती असे आहे.
ही योजना काय आहे?
LIC ची ‘न्यू जीवन शांती’ योजना एक Single Premium Deferred Annuity योजना आहे. म्हणजे तुम्ही फक्त एकदाच काही रक्कम गुंतवता आणि त्यावरून तुम्हाला ठराविक वेळानंतर ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळायला लागते. ही योजना ३० ते ७९ वयोगटातील व्यक्तींसाठी खुली आहे.
पेन्शन किती मिळणार?
तुम्ही किती गुंतवणूक करता आणि किती वर्षांनी पेन्शन घ्यायचं ठरवता, यावर तुमची पेन्शन रक्कम ठरते.
उदाहरणच द्यायचं झालं, तर –
जर एखाद्या ५५ वर्षांच्या व्यक्तीनं ₹११ लाख गुंतवले, आणि पेन्शन घेण्यास ५ वर्ष थांबले, तर त्याला दरवर्षी ₹१,०१,८८० इतकी पेन्शन मिळू शकते.
याचं ब्रेकअप बघायचं झालं, तर –
सहा महिन्याला ₹४९,९११
महिन्याला ₹८,१४९
या योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम ₹1.5 लाख आहे. वर मर्यादा नाही, म्हणजे इच्छेनुसार कितीही गुंतवता येते. आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास पूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
Disclaimer:
वरील माहिती LIC च्या उपलब्ध माहितीनुसार आणि सोशल मीडिया व अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. गुंतवणूक करण्याआधी तुम्ही LIC एजंटकडून किंवा अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. यामधील परताव्याचे आकडे हे उदाहरणादाखल आहेत. ही योजना व्यक्तिनिहाय वेगळी असू शकते. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.