Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो बहिणी गेल्या काही दिवसांपासून मोबाईलमध्ये सतत मेसेज तपासतायत… ‘पैसे जमा झाले’ असा एक एसएमएस येईल या आशेने. ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते वेळेवर आले, पण नोव्हेंबर महिना सरून गेला तरी खात्यात एकही रुपया नाही. त्यामुळे गावाकडच्या सगळ्या बस-स्टॉपवर, किराणा दुकानात, अंगणवाडीजवळ… जिथे जिथे महिला भेटतात तिथे एकच चर्चा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा ₹१५०० कधी टाकणार? Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना दर महिन्याला हजार-पाचशेचा मोठा दिलासा मिळतोय. घरातील किराणा, मुलांचे खर्च, आणि छोट्या-छोट्या गरजा त्या याच पैशातून भागवतायत. त्यामुळे एक महिना जरी हप्ता उशिरा आला तरी घरात ताण येतो, आणि महिलांची चिंता वाढते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातून एकच आवाज उठताना दिसला नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार? शासनाकडून अजून स्पष्ट घोषणा नसली, तरी सूत्रांमधून असा अंदाज मिळतोय की नोव्हेंबरचा हप्ता येत्या आठवड्यात कधीही जमा होऊ शकतो. नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पैसा जमा करण्याचा विचार सुरू असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे महिलांची नजर आता बँक खात्याकडेच लागून राहिली आहे.यामध्ये आणखी एक चर्चा जोरात आहे नोव्हेंबर-डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र येतील का?
कारण मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र टाकले होते. त्यामुळे या वेळीही निवडणुकीचा माहोल लक्षात घेता सरकार महिलांना दुहेरी लाभ देईल का, हा मोठा प्रश्न महिलांच्या मनात घर करून बसलाय. काही तज्ञांचा अंदाज आहे की नोव्हेंबरचा हप्ता निवडणुकीपूर्वी आणि डिसेंबरचा हप्ता शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो. पण अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम तीव्र आहे.
दरम्यान, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे KYC अनिवार्य. शासनाने स्पष्ट केलंय की ३१ डिसेंबरपूर्वी KYC पूर्ण केलं नाही तर पुढील महिन्यापासून योजना थांबू शकते. अजूनही लाखो महिलांची KYC बाकी आहे आणि हेच कारण देत सरकारने मुदतवाढ दिली. ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना KYC म्हणजे काय, कुठे करायचं, कोणते कागद लागतात याची अजून व्यवस्थित माहिती नाही. त्यामुळे बऱ्याच जणी कार्यालयात चकरा मारतायत, तर काहींच्या आधारमध्ये झालेल्या चुकीमुळे काम अडकून बसलंय.
नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार यावर संपूर्ण राज्यभरात उत्सुकतेचा शिखरबिंदू आलाय. शासनाकडून घोषणा झाली की लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा दिलासा दिसेल. आता फक्त एका मेसेजची, ‘₹1500 credited’ या ओळीची वाट पाहत सगळ्या बहिणी शांतपणे थांबल्या आहेत.