RBI ची मोठी घोषणा! देशातील फक्त 3 बँका कधीच बुडणार नाहीत, तुमचे पैसे 100% सुरक्षित यादी पाहून तुम्हीही विचार बदलाल!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Safe Bank List 2025 | सर्वसामान्य माणूस वर्षानुवर्षे कष्ट करून पैसा जमा करतो… एखाद्या गरजेच्या दिवशी हा पैसा आपल्याला आधार देईल, याच आशेवर तो बँकेत ठेवला जातो. पण दुर्दैवाने अनेक वेळा बँकच बुडते आणि आयुष्यभराची कमाई काही तासांत धुळीस मिळते. ठेवीदाराच्या हातात मग उरतो तो फक्त पश्चाताप!

अशा घटना देशात पूर्वी घडल्या आहेत. म्हणूनच कोणत्याही बँकेत पैसे ठेवण्यापूर्वी त्या बँकेची सुरक्षितता, स्थिरता आणि विश्वासार्हता तपासून घेणे किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.

याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अखेर देशातील सर्वात सुरक्षित 3 बँकांची अधिकृत माहिती दिली आहे. या बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्यांनी आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण आरबीआयनेच सांगितले आहे की या बँका बुडण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे!

कोणत्या आहेत त्या 3 सुपर-सुरक्षित बँका?

आरबीआयच्या नुसार खालील तीन बँका ‘डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स’ (D-SIBs) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) – सरकारी बँक

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – खाजगी

एचडीएफसी बँक (HDFC Bank) – खाजगी

या तिन्ही बँकांच्या बुडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण त्यांचे कामकाज इतके मोठे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहे की त्या बुडल्या तर थेट भारतीय अर्थव्यवस्थेलाच धक्का बसेल.

या बँका इतक्या महत्त्वाच्या का?

या बँकांचे कार्यक्षेत्र प्रचंड मोठे आहे. लाखो कोटींची कर्जे, देशाच्या GDP मधील मोठा वाटा, शेअर बाजारावर सरळ परिणाम… त्यामुळे भविष्यात कधीही आर्थिक संकट आले तरी भारत सरकार थेट हस्तक्षेप करून या बँकांना वाचवेल, अशी खात्री आरबीआयने व्यक्त केली आहे.

म्हणजे सोप्या भाषेत —
या बँका बुडल्या तर देश बुडेल, त्यामुळे या बँका कधीच बुडू दिल्या जाणार नाहीत!

या बँका अधिक सुरक्षित कशामुळे?

आरबीआयच्या नियमांनुसार या तिन्ही बँकांना:

इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी ठेवावा लागतो

संकटाच्या वेळी वापरता येईल असा CET-1 (कॉमन इक्विटी टियर-1) भांडवल जास्त प्रमाणात बाळगावे लागते

हा आपत्कालीन निधी आर्थिक धक्के सहन करण्यासाठी तयार ठेवला जातो. त्यामुळे देशात कोणतेही संकट आले तरी ग्राहकांच्या पैशांना धोका निर्माण होत नाही.

या बँकांची D-SIB यात्रा

2014 – संकल्पना मांडली

2015 – SBI यादीत

2016 – ICICI Bank समाविष्ट

2017 – HDFC Bank देखील D-SIB मध्ये

त्यानंतर दरवर्षी या बँकांची आर्थिक स्थिती तपासून त्यांना पुन्हा सुरक्षित यादीत ठेवले जाते.

तळटीप : तुमचे पैसे कुठे सुरक्षित?

जर तुमचे पैसे SBI, ICICI किंवा HDFC मध्ये ठेवलेले असतील तर ते देशातील सर्वात सुरक्षित हातात आहेत.
आरबीआय आणि केंद्र सरकार दोन्हीही या बँकांवर कायम कडक देखरेख ठेवतात.

सर्वसामान्य माणसाने आपल्या कष्टाची कमाई कुठे ठेवायची याचा निर्णय घेताना या माहितीचा नक्की विचार करावा. कारण पैसा कमवणे कठीण असते… आणि तो सुरक्षित ठेवणे याहूनही कठीण!

Leave a Comment