पीएम किसानचे तीन हप्ते मिळाले नाहीत…? काळजी करू नका! असा करा अर्ज, मिळेल संपूर्ण परतावा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: देशात अजूनही लाखो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. पेरणी, खतं, बियाणं, औषधं, खते, हे सगळं वाढत्या दराने महाग होत चाललंय. अशात सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी खरंच हाताला धरायला आधार ठरली आहे. वर्षाचे तीन हप्ते मिळून ६ हजार रुपये ही रक्कम कदाचित मोठी नसली तरी, खरी गरज पडली तेव्हा हीच थोडीशी मदत शेतकऱ्यांना उभं करते—यात शंका नाही.

शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले २१ हप्ते

आजपर्यंत केंद्र सरकारने तब्बल २१ हप्त्यांचं वितरण केलं आहे. एवढंच नाही तर राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार पीएम किसानद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ४.०९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट पाठवण्यात आली आहे. योजनेत कोणत्याही मध्यस्थाची भूमिका नाही… पैसा थेट बँक खात्यात! ही पारदर्शकता या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.

९२% शेतकरी समाधानी!

किसान कॉल सेंटरने केलेल्या सर्वेक्षणात ९२ टक्क्यांहून अधिक शेतकरी या योजनेवर समाधानी असल्याचं आढळलं. महत्त्वाचं म्हणजे ९३% शेतकरी ही रक्कम खरी शेती कामांसाठी वापरतात… बियाणं, खतं, औषधं! IFPRI च्या अभ्यासानुसार या पैशाचा लाभ केवळ शेतीला नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळतो आहे. गावातली आर्थिक चक्रं जिवंत राहण्यासाठी ही मदत खूप महत्वाची ठरतेय. PM Kisan Yojana

८५% शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले!

कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की ८५% शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढ झाल्याचं मान्य केलं आहे. म्हणजेच या पैशामुळे पीक फसलं, हवामान बिघडलं, रोग आला तरी शेतकऱ्यांना कर्जासाठी धावपळ करावी लागत नाही.

या योजनेमुळे

  • गरिबी कमी
  • अन्नसुरक्षा वाढ
  • महिलांचा सहभाग वाढ
  • सरकारी प्रणालीत पारदर्शकता

असं सगळं सकारात्मक परिणाम दिसतो आहे.

पण… तुमचे तीन हप्ते मिळाले नाहीत?

बर्‍याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की दोन-तीन हप्ते मिळाले नाहीत. अशा वेळी गप्प बसू नका! तक्रार केल्यास परतावा मिळू शकतो.

तक्रार नोंदवण्याची सोपी पद्धत👇

1️⃣ PM Kisan च्या वेबसाईटला जा — pmkisan.gov.in
2️⃣ Register Complaint वर क्लिक करा
3️⃣ तुमची समस्या स्पष्ट लिहा
4️⃣ आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा
5️⃣ तुमचं नाव, पत्ता, मोबाईल, बँक तपशील लिहा
6️⃣ Submit करा

तक्रार नोंदवली की पुढील काळात किती हप्ते मिळणार, कधी मिळणार याबाबत सर्व तपशील मिळतो.

EKYC केली का? नाही तर लगेच करा!

आजही काही शेतकऱ्यांना पैसा थांबतोय कारण त्यांचं EKYC पूर्ण नाही.
EKYC पूर्ण नसल्यास—

  • हप्ता थांबू शकतो
  • अर्ज reject होऊ शकतो
  • माहिती mismatch असेल तरी हप्ता अडकतो

म्हणून
✔ नाव
✔ बँक तपशील
✔ आधार
✔ वडिलांचे नाव
✔ भूधारक माहिती
— हे सगळं नीट तपासून सुधारा.

शेती म्हणजे नुसती माती नव्हे… तर आयुष्य आहे. महागाई वाढतेय, हवामान बदलतंय, पाऊस काहीच खात्रीचा नाही… अशात सरकारने दिलेली मदत छोटी असली तरी योग्य वापर झाली, वेळेवर पैसा पोहोचला तर हजारो कुटुंबांना आधार मिळतो. आज आपल्याला या योजनांचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे. चूक झाली असेल, माहिती कमी असेल किंवा हप्ता अडकला असेल तर तक्रार करा, EKYC करा… हक्काचा पैसा आहे, नक्की घ्या.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment