Ladki Bahin Yojana ! 1500 नाही… थेट 3000 रुपये मिळणार? नोव्हेंबर–डिसेंबर हप्ता कधी येणार ते जाणून घ्या! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 3000 Rupees | नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरला सुरुवात झाली, पण अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सरकारकडून एकही अधिकृत घोषणा आलेली नाही. नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता तर नेमका कधी येणार, दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार का, महिलांच्या मनात संभ्रमच निर्माण झाला आहे.

गावोगाव, शहरोगाव महिला बँकेकडे फेऱ्या मारताना दिसतायत. “कधी येणार हप्ता?” हा एकच प्रश्न सगळ्यांच्या तोंडी. कारण ₹1500 चा हप्ता अनेक कुटुंबांसाठी रोजच्या खर्चात मोठा आधार बनला आहे.

नोव्हेंबर + डिसेंबरचे मिळून 3000 रुपये मिळणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही माहिती अद्याप अधिकृत नसून, फक्त चर्चेच्या स्तरावर आहे. सरकारने अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

काही सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आदिती तटकरे याबाबत लवकरच निवेदन देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

₹1500 की ₹3000? नेमकं किती मिळणार?

डिसेंबरमध्ये खरोखर दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जातील का? की फक्त एकाच महिन्याचा ₹1500 जमा होईल? याबाबत शासनस्तरावर अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे.

महिलांची मात्र एकच मागणी  “जमा करा, पण वेळेवर करा.”

KYC अनिवार्य  नाही केली तर पुढचे हप्ते थांबणार

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

केवायसी अनिवार्य करण्यात आली असून, त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

जर केवायसी केली नाही,

✔️ पुढचे हप्ते मिळणार नाहीत

✔️ तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते

म्हणजेच, कोणताही धोका नको असेल तर लगेच ऑनलाइन KYC पूर्ण करून घ्या.

योजना बंद होणार नाही – सरकारची ग्वाही

विरोधकांनी “लाडकी बहीण योजना बंद होणार” असा आरोप केला होता.

मात्र, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की  

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही.”

म्हणजेच महिलांनी काळजी करू नये, योजना सुरूच राहणार आहे.

Leave a Comment