Pm Kisan Yojana 22nd installment 2026 : नव्या वर्षाची चाहूल लागली की गावातल्या शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळीच धावपळ सुरू होते. शेतीचं काम, रब्बी पिकाची काळजी, दिवसभराच्या कष्टांमध्ये अजून एक गोष्ट डोक्यात असते या वेळचा पीएम किसानचा हप्ता कधी येणार? कारण आजच्या महागाईच्या काळात दोन हजार रुपयांचाही आधार खूप महत्त्वाचा होतो. घरातील बियाणं, खतं, जनावरांची काळजी… एवढ्या सगळ्या खर्चात हा हप्ता खरा हाताला धरून आधार देणारा आहे.
मागच्या महिन्यात सरकारने 21 वा हप्ता 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. आणि आता 2026 मधल्या 22व्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. कुठेही अधिकृत तारीख नाही, पण सरकारच्या नियमांनुसार पाहिलं तर हा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये येण्याची शक्यता जास्त मानली जाते. पण हप्ता मिळण्यासाठी फक्त वाट बघून काही होणार नाहीया वेळेस सरकारने ज्या चार गोष्टी अनिवार्य केल्या आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय कोणाच्याही खात्यात एक रुपयाही पडणार नाही. Pm Kisan Yojana 22nd installment 2026
गावात पाहिलं तर अनेक शेतकरी अजूनही ई-केवायसीचा विचार पुढे ढकलतात, काहींचं आधार बँकेशी लिंक नाही, काहींनी Farmer Registry केली नाही, तर काहींनी जमिनीचा भू-सत्यापन पूर्ण केलेलं नाही. मागच्या काही हप्त्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांचे पैसे केवळ या अपूर्ण प्रक्रियांमुळे अडकले. त्यामुळे या वेळेस केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की जे शेतकरी हे चार काम पूर्ण करतील, त्यांनाच 22वा हप्ता मिळणार.
ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क नसताना OTP येईना म्हणून काहींचं काम तसंच राहिलं आहे. कुणाचा आधार नंबर बँकेत अपडेट नाही, तर कुणाचा मोबाईल नंबर पोर्टलवर चुकीचा आहे. अशी हजारो लहान लहान अडचणी शेतकऱ्यांना येतात, पण हप्ता लागताच बँकेत जाणारा मेसेज न आल्याने दिवसाची मजुरी सोडून शेतकरी पुढे-पुढे बँकेत चकरा मारत राहतो. सरकारही आता हे चित्र बदलण्याच्या प्रयत्नात असून, eKYC आणि आधार लिंक पूर्ण करायला जास्त वेळ लागणार नाही असं सांगतंय.
सरकारच्या नियमांनुसार पीएम किसानचा पहिला हप्ता एप्रिल-जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च या कालावधीत येतो. त्यामुळे 22 वा हप्ता साधारण फेब्रुवारीच्या आसपास जमा होईल अशी चर्चेला जोर आहे. पण अजून अधिकृत तारीख नाही, त्यामुळे सरकारचा निर्णय कधीही येऊ शकतो.
याच्या सोबत आणखी एक मोठी चर्चा शेतकऱ्यांमध्ये ऐकायला येते पीएम किसानची रक्कम वाढणार का?
आत्ता 6000 रुपये वर्षाला मिळतात. पण 2026–27 चा केंद्रीय बजेट फेब्रुवारीत सादर होणार आहे आणि यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मदत वाढवण्याची शक्यता बोलली जाते आहे. काही अर्थतज्ज्ञ म्हणतात की योजना 6000 वरून 9000 रुपये वार्षिक केली जाण्याची चर्चा आहे. जरी सरकारने अजून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही, तरी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता मात्र प्रचंड आहे. “जर 9000 केले तर रब्बीचं काम, खतं, बियाण्यांचा खर्च थोडा हलका झाला असता” असं अनेक शेतकरी सांगताना दिसतात.
अनेकांना अजूनही माहिती नाही की ही योजना मिळण्यासाठी कोणते कागद आवश्यक आहेत. नाव, जन्मतारीख, आधार नंबर, बँक खाते, IFSC, मोबाइल नंबर, जमिनीचा पुरावा… ही सगळी माहिती बरोबर असणं गरजेचं आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे eKYC, भू-सत्यापन आणि Farmer Registry पूर्ण असणं अत्यावश्यक आहे. यापैकी एकही गोष्ट राहिली तर हप्ता थांबणारच.
आता हे सर्व ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने गावातल्या नेट-कॉर्नरवर ओळी लागतात. कुणी आधार OTP टाकतोय, कुणी Beneficiary Status चेक करतोय, तर कुणी Farmers Corner मध्ये जाऊन eKYC करतायत. आधी जसं बँकेत, पंचायत समितीत, तलाठ्याकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या, तसं आता काही अंशी कमी झालं आहे.
हप्त्याची उत्सुकता वाढली आहे आणि सरकारकडून मोठं अपडेट कधीही येऊ शकतं. पण भाऊ, यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा ही चार कामे वेळेवर करा, नाहीतर तुमचा हप्ता दुसऱ्याच्या खात्यात जाणार नाही पण तुमच्याही खात्यात येणार नाही.
शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळाले म्हणजे त्याचं संपूर्ण घर उभं राहतं. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून दिलासा देणारी हवा वाहणार का? रक्कम वाढणार का? आणि 22 वा हप्ता कधी येणार? याकडे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.