Today Astrology Update | 7 डिसेंबर 2025… आजचा दिवस अनेकांसाठी अगदी वेगळा ठरणार आहे. कित्येक जण मेहनत करून-करून थकलेत, पण यश मात्र हाताशी येत नाही. घरखर्च, नोकरी, प्रेमसंबंध, भविष्यातील योजना सगळं जणूकाही अडखळतंय असं वाटतंय. पण आजची संध्याकाळ काही खास लोकांसाठी मोठं वळण घेऊन येणार आहे असं ज्योतिषी सांगताहेत.
कारण आज रविवार, 7 डिसेंबरला एक दुर्मिळ असा ग्रहसंयोग घडतोय. संध्याकाळी 8:27 वाजता मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे आणि हा संयोग ज्योतिषशास्त्रात “गुरु-सेनापती मंत्र योग” म्हणून ओळखला जातो. हा योग म्हणजे धैर्य, ऊर्जा, बुध्दीमत्ता आणि शहाणपण एकत्र येऊन एकाच वेळी नशिबाच्या दारावर थाप मारतात तसा काळ. अशा वेळेला माणसाची जुनी अडलेली कामंही चालू लागतात, तर नवीन कामांना तर वेगच येतो.
ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं की, मंगळ धनु राशीत असताना पैसा, नोकरी, शिक्षण, प्रेम, परदेश प्रवास आणि दीर्घकालीन योजनांवर विशेष सकारात्मक परिणाम दिसतो. हा संयोग मात्र खास तीन राशींसाठी अधिकच शुभ ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी? चला पाहूया.
⭐मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अक्षरशः नवा उत्साह घेऊन येणार आहे. मंगळाचा प्रभाव तुमचे करिअर आणि आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं अचानक गती घेतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील आणि बाहेरील लोकांकडूनही आदर मिळेल. शिक्षण किंवा प्रवासाचे प्लॅन असेल तर तेही लाभदायी ठरणार. जणू काही देवाने हात उचलून साथ दिल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.
⭐सिंह (Leo)
सिंह राशीच्या लोकांना या ग्रहसंयोगाचा मोठा फायदा होणार आहे. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल, नवीन संधी मिळतील आणि आर्थिक बाबतीत नफा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी तर हा काळ सोन्याचा आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून अनपेक्षित असा पाठिंबा मिळेल. कुटुंबात आनंद, आरोग्य स्थिर आणि प्रेमसंबंध गोड राहतील. एखादा धाडसी निर्णय घेतलात तर त्याचा फायदा पुढे मोठ्या प्रमाणात दिसेल. सिंहराशीवाले लोक म्हणतात ना “माझं वेळ अब आला!” तोच क्षण आता उदयास येतोय.
⭐धनु (Sagittarius)
धनु राशीतच मंगळ प्रवेश करत असल्यामुळे हा संयोग धनुराशीवाल्यांसाठी तर आशीर्वादच आहे. तुमच्या नशिबाचा तारा आजपासून उजळू लागेल. शिक्षण, करिअर, पैसा आणि प्रतिष्ठा सर्वच गोष्टींमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. जुन्या वादविवादांचं समाधान स्वतःहून होईल. घरात शांतता आणि समाधान राहील. कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. समाजात तुमच्या मताला किंमत मिळेल आणि लोक तुमचा सल्ला मानतीलही.