Bank Holiday December 2025 | डिसेंबर महिना सुरु झाला की वर्षअखेरीची धावपळ, लग्नसराई, ख्रिसमसची तयार-तयारी… आणि याच दरम्यान बँकेचं एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पुढच्या आठवड्यात ८ ते १४ डिसेंबरदरम्यान बँका तब्बल चार दिवस बंद राहणार आहेत. म्हणजेच, ज्यांना बँकेत जाऊन कामे उरकायची आहेत त्यांनी हा आठवडा व्यवस्थित प्लॅन करणं अगदीच गरजेचं ठरणार आहे.Bank Holiday December 2025
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या यादीनुसार, दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतातच. त्यात भर म्हणजे राज्यानुसार लागू होणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्या ज्या अनेकदा सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाहीत. त्यामुळे कुणाचं कर्जाचं काम अडकतं, कुणी चेक जमा करू शकत नाही, तर कुणाला व्यवहार पुढे ढकलावे लागतात.
९ डिसेंबरला केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरम येथे बँका पूर्णपणे बंद राहतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचा देशातील इतर राज्यांवर परिणाम नाही. त्या दिवशी इतर सर्व ठिकाणी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
दरम्यान, १२ डिसेंबरला मेघालयमध्ये सुट्टी असेल. पा तोगन नेंगमिंजा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमधील बँका त्या दिवशी काम करणार नाहीत. लोकल सुट्टी असली तरी देशभरातील इतर बँका नियमित सुरू राहतील.
यानंतर १३ डिसेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार. त्यामुळे या दिवशी देशभरातील सर्वच बँका बंद राहणार हे निश्चित. आणि लगेचच रविवार… म्हणजे दोन दिवस सलग सुट्टी.
या सर्वांच्या एकत्रित गणनेत RBI ने डिसेंबर २०२५ मध्ये एकूण १८ बँक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यापैकी काही सुट्ट्या सर्व राज्यांना लागू, तर काही फक्त प्रादेशिक पातळीवर. २५ डिसेंबरला ख्रिसमस असल्यामुळे त्या दिवशी देशभरात सर्व बँका बंद राहणार हे नक्की.
अशा वेळी बँकेत जाणाऱ्यांना सल्ला एकच स्थानिक शाखेची वेळ, सुट्टी आणि व्यवहाराची उपलब्धता एकदा तपासून घ्या. कारण महिनाअखेरीच्या या गर्दीत बँकेचे दरवाजे बंद असतील तर अनेक कामांचा ताण वाढू शकतो.
हो, पण चांगली गोष्ट म्हणजे एटीएम, UPI आणि इंटरनेट बँकिंग संपूर्ण सुट्टीच्या काळातही सुरू राहणार आहेत. म्हणजेच, व्यवहाराची चक्रं पूर्णपणे थांबणार नाहीत.
वर्षअखेरीची कामं, खरेदी, कर्जाचे हप्ते, पगाराचे व्यवहार… यामध्ये एखादी सुट्टी चुकीच्या दिवशी आल्यास सामान्य माणसाला त्रास होतोच. म्हणूनच ही माहिती वेळेत समजणं फार महत्त्वाचं.
डिसेंबर महिन्यातील या मोठ्या सुट्टींच्या मालिकेमुळे बँकिंग कामांवर परिणाम होणार हे नक्की. पण आधीच नियोजन केलं, तर कुठलंही काम कधीच अडत नाही हेही तितकंच खरं!