Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी सध्या मोठी अस्थिरता आणि चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे सण-उत्सवांचे दिवस जवळ येत असताना, नोव्हेंबर महिन्याचा ठरलेला मासिक हप्ता डिसेंबर उजाडला तरी जमा झालेला नाही. लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या त्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान, “आता नोव्हेंबर आणि डिसेंबर, दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ₹३००० रुपये एकत्र खात्यात जमा होणार का?” असा ज्वलंत प्रश्न राज्यातील लाखो महिला विचारत आहेत.
दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता- पण घोषणा नाही
सध्या बाजारपेठेत आणि लाभार्थींमध्ये जोरदार चर्चा आहे की, रखडलेले नोव्हेंबर आणि चालू असलेला डिसेंबर, या दोन्ही महिन्यांचे ₹१५०० + ₹१५०० = ₹३००० रुपये थेट एकत्र खात्यात जमा केले जाऊ शकतात. असे झाले तर महिलांना त्यांचा घर खर्च भागवण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. Ladki Bahin Yojana
असे असले तरी, राज्य सरकार किंवा महिला व बाल विकास विभागाकडून याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अनेकांचे म्हणणे आहे की, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच या हप्त्यांच्या जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत मिळाला आहे. त्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दहा डिसेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल पाहिजे. मात्र तसे झाले नाही तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्याचे हप्ते एकत्रित मिळू शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपयांच लाभ मिळू शकतो. त्यामुळे, महिलांना सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागत आहे.
हप्ता थांबला? नाही! E-KYC चुकवू नका!
हप्ते वेळेवर न आल्यामुळे विरोधकांनी या योजनेबद्दल वेगवेगळे आरोप केले होते. पण भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की, “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ही योजना सुरूच राहील.” त्यामुळे योजना बंद होणार नाही, ही खात्री आहे. मात्र, हप्ते जमा होण्यात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक समोर आला आहे- तो म्हणजे ई-केवायसी (E-KYC). ज्या महिलांनी त्यांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांचे हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत दिली आहे.
✅ आता काय करायचे?
केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे अनिवार्य आहे. लाभार्थी महिला खालील ठिकाणांची मदत घेऊन हे काम पूर्ण करू शकतात:
- योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर: https://ladakibahin.maharashtra.gov.in
- जवळचे अंगणवाडी केंद्र
- छावणी केंद्र
- CSC (Common Service Center) सेंटर
निष्कर्ष: महिलांना सध्या हप्त्यांची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ई-केवायसीची ‘डेडलाइन’ चुकवून चालणार नाही. अन्यथा, ‘लाडकी बहीण’ चे पैसे हातातून निसटण्याची भीती आहे!