December Predictions 2025 | डिसेंबर महिन्यातला हा दुसरा आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी भारी ठरण्याची चिन्हं आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करतायत. त्याचवेळी राहु कुंभ, शनि मीन, केतु सिंहमध्ये स्थिर आहेत. शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य हे वृश्चिक राशीत विराजमान असल्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत. ९ डिसेंबरला शुक्र ज्येष्ठा नक्षत्रात तर १० डिसेंबरला बुध अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
या सर्व हालचालींमुळे वृश्चिक राशीत चतुर्ग्रही योग, बुधादित्य, मंगलादित्य आणि शुक्रादित्य असे दमदार राजयोग सक्रिय होत आहेत. त्यातच लक्ष्मी नारायण, नवपंचम, केंद्र आणि षडाष्टक योगही प्रभाव टाकणार आहेत. ज्योतिषी सलोनी चौधरी यांच्या मते, या आठवड्यात तयार होणारे योग काही राशींच्या लोकांसाठी सुख, समृद्धी, नशीब आणि प्रगतीची मोठी दारे उघडू शकतात.
मेष (Aries) – मेहनतीचं सोनं होणार
या आठवड्यात नवीन संधी दार ठोठावतील. कामात केलेली मेहनत फळाला येईल पण ताण व थकवा टाळणं गरजेचं. पैशासंदर्भात काळजी घ्या. घरात संवाद ठेवा, नाती सुधारतील. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक.
वृषभ (Taurus) – स्थिरता आणि शांततेचा काळ
कामात चांगले परिणाम, पैशाच्या बाबतीत नियंत्रण गरजेचं. कुटुंबात शांतता आणि सहयोग वाढेल. पचन व झोपेची काळजी घ्या. संतुलित दिनचर्या फायद्याची.
मिथुन (Gemini) – बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या बाजूने
मानसिक उत्साह वाढेल. नवीन योजना यश देऊ शकतात. कार्यक्षेत्रात समन्वय आवश्यक. पैशाबाबत संयम ठेवा. हलका ताण जाणवू शकतो, थोडी विश्रांती घ्या.
कर्क (Cancer) – सामाजिक आयुष्यात रंगत
या आठवड्यात कार्यक्रम, नवीन संपर्क यांचा फायदा होईल. कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक स्थिती ठीक. मन:शांती महत्वाची. नाती संभाळून घ्या.
सिंह (Leo) – नेतृत्व गुण चमकणार
कामात तुमच्या प्रयत्नांना दाद मिळेल. आर्थिक निर्णयात घाई नको. प्रेम आणि कौटुंबिक जीवन सुदृढ. हलका व्यायाम फायद्याचा.
कन्या (Virgo) – योजना आणि शिस्त महत्वाची
ध्येयांवर लक्ष केंद्रित ठेवा. पैसे सांभाळून वापरा. घरात सहयोग वाढेल. झोप आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ (Libra) – जीवनात संतुलन येईल
काम आणि घर यांच्यात तोल राखा. पैशाच्या व्यवहारात सावध राहा. नात्यांमध्ये स्पष्टता आवश्यक. मानसिक शांतीसाठी ध्यान उपयोगी.
वृश्चिक (Scorpio) – राजयोगाचा थेट फायदा
या आठवड्यात मोठ्या संधी, नवीन जबाबदाऱ्या आणि सकारात्मक बदल दिसतील. नाती मजबूत होतील. जुने मित्र उपयुक्त ठरतील. मानसिक शांतता राखा.
धनु (Sagittarius) – आत्मविश्वासात वाढ
नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक घाई टाळा. नात्यांमध्ये समज आवश्यक. मन शांत ठेवा.
मकर (Capricorn) – शिस्त आणि नियोजनाचा काळ
कामात पद्धतशीर राहा. पैशात संयम. घरात सहयोग ठेवा. नियमित दिनचर्या पाळा.
कुंभ (Aquarius) – सर्जनशीलता आणि सामाजिकता वाढेल
नवीन विचार, योजना फायदेशीर. आर्थिक सुरक्षिततेकडे लक्ष द्या. नाती जपा. आरोग्यासाठी संतुलन महत्वाचं.
मीन (Pisces) – आत्मचिंतनाचा आठवडा
सर्जनशील कामात यश. पैशाच्या गोष्टी विचारपूर्वक करा. नात्यांमध्ये संवाद वाढेल. ध्यान, योग आणि शांतता उपयोगी.
डिसेंबरचा हा आठवडा काहींसाठी मोठी उभारी, काहींसाठी शिकवण आणि काहींसाठी भावनिक शांतता घेऊन येतोय. ग्रहांची हालचाल बदलत असली तरी आपल्या कृती, संयम आणि जनकल्याणाची भावना हीच खरी नशीब बदलणारी ताकद असते. नशीब उजळलं तरी नम्र राहा… आणि परिस्थिती कठीण असली तरी धीर सोडू नका. कारण काळ बदलतो… आणि बदलल्यावर माणसाचं आयुष्यही उजळतं.