Astrology Today : शुक्राचा गोचर असं काही असतं की काहीवेळा अचानक आयुष्याची दिशा बदलून टाकतो. ज्योतिषात शुक्राला सौंदर्य, प्रेम, सुखसंपत्ती, आनंद आणि आर्थिक वाढीचं प्रतीक मानलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असेल तर त्याच्या जीवनात तारतम्य, आकर्षण, पैसा, वैवाहिक आयुष्यातील शांतता, करिअरमध्ये झपाट्याने वाढहे सगळं नैसर्गिकपणे दिसतं. आणि जेव्हा शुक्र गुरुच्या घरात म्हणजेच धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा काही राशींचं भाग्य अक्षरशः चमकून उठतं. Astrology Today
२० डिसेंबरपासून शुक्र धनु राशीत भ्रमण करायला सुरुवात करणार आणि तब्बल २६ दिवस हा प्रवास चालणार आहे. म्हणजे १३ जानेवारीपर्यंत या गोचराचा थेट परिणाम दिसेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांमध्ये या काळाबाबत प्रचंड उत्सुकता आहे, कारण आधीच्या वर्षांतही या कालखंडात अनेकांना पैशांची वाढ, प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता, नोकरीत सुधारणा आणि अचानक लाभ मिळाले होते. यंदाही अशाच आशेचं वातावरण आहे, आणि या वर्षी विशेषतः तीन राशींवर शुक्र खूप प्रसन्न राहणार असल्याचं दिसतं.
सिंह राशी( Leo) : सिंह राशीवर तर या काळात एखाद्या आशीर्वादासारखा परिणाम होणार आहे. शुक्र सिंह राशीच्या पाचव्या भावातून जात असल्यामुळे प्रेमसंबंध सुधारण्याचे, तुटलेली नाती पुन्हा जुळण्याचे, आणि लव्ह मॅरेजसाठी योग्य वेळ येण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. घरात संततीसंबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल असं वातावरण जाणवेल. पैशाच्या बाबतीतही हातात थोडा मोकळेपणा येणार आहे. आतापर्यंत आर्थिक ताण जाणवत होता तो हळूहळू कमी होईल. शिक्षण, करिअर, स्पर्धा सगळीकडे नशीब साथ देणारं चित्र.
मेष राशी (Aries) : मेष राशीसाठी गुरुच्या घरात शुक्राचं आगमन म्हणजे एकप्रकारे सोन्याहून पावन गोष्ट. मेष राशीचे लोक या काळात विवाह, करिअर किंवा व्यवसायासंदर्भात मोठे निर्णय घेऊ शकतात आणि ते निर्णय योग्य दिशेने जातील. दांपत्यामध्ये समजूतदारपणा वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गती येईल. ज्यांनी परीक्षा दिल्या आहेत त्यांना आशादायक निकाल मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. व्यापाऱ्यांना तर अचानक संधी मिळण्याची शक्यता आहे कदाचित एखादा चांगला करार, एखादी नवीन ब्रांच, किंवा चांगला नफा. उत्पन्नवाढीचे संकेत खूप स्पष्ट आहेत.
वृश्चिक राशी (Scorpio) : वृश्चिक राशीसाठी ही चाल अतिशय शुभ मानली जाते. घराघरात शांत वातावरण, मन ताजं ठेवणारे क्षण आणि कुटुंबासोबत छान वेळ हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती खूपच बळकट होईल. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता. जे कर्ज होते ते कमी होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत; हा प्रवास व्यर्थ जाणार नाही, काहीतरी चांगलं मिळवूनच देईल. आरोग्यातही सुधारणा दिसेल. ज्यांना इन्व्हेस्टमेंटची योजना आहे त्यांनी या काळात केलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
(Disclaimer : ज्योतिषीय गणनेवर आधारित माहिती. जीवनातील मोठे निर्णय विचारपूर्वकच घ्यावेत. याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही व आम्ही जिम्मेदार राहणार नाही.)
हे पण वाचा | 2026 मध्ये या राशीचे नशीब चमकणार! पैसा पैसा घरी येणार प्रचंड धनसंपत्ती