Cold wave in the state : राज्यातल्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घडामोडी आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चक्रीवादळाची धकाधक, पावसाचे ढग, अचानक वाढलेली दमट हवा… हे सगळं थोड्याशा वेळासाठी जरी शांत झालं असलं, तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्यभर थंडीनं गारठा वाढवायला सुरुवात केली आहे. तापमानात झालेली घट इतकी झपाट्याने आली आहे की काही ठिकाणी रात्रीचा पारा दहाच्या खाली तर काही भागांमध्ये तर ९ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. सकाळच्या वेळी अंगावर शहारे आणणारा वारा, अंग चुटपूटवणारं थंड हवामान आणि आभाळात गारठलेल्या वातावरणाची चाहूल राज्यभर या सगळ्याचा अनुभव लोकांना तीव्रतेनं येत आहे. तू
मागच्या दोन-तीन दिवसांत तर काही भागात तापमान एवढं कोसळलं की घराबाहेर पडताना चेहऱ्यावर धुक्याची चादरच बसल्यासारखं वाटू लागलं आहे. वातावरणातला हा बदल इतका झपाट्यानं झालाय की नोव्हेंबरमध्ये जाणवणारी उबदार हवा एकदम गायब झाली आणि डिसेंबरचा गारवा जणू दोन पावलं पुढे धावत आला. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या भागांमध्ये तर हवामान खात्यानं स्पष्ट सांगितलं आहे की पुढचे काही तास आणि त्यानंतरचे दिवस थंडीची लाट अधिकच तीव्र होणार आहे. घराबाहेर पडलं की नाकाच्या टोकाला लागणारी टोचणी, हातपाय गार होण्याची ती भावना लोकांना त्याचा अनुभव आजपासूनच येऊ लागलाय. Cold wave in the state
राज्यातल्या अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीची स्थिती अशी आहे की पहाटेच्या सुमारास धुक्याने अक्षरशः रस्ते झाकले जात आहेत. गोंदियेसारख्या भागात तर हवेतलं दाट धुकं इतकं वाढलं की काही मीटरपेक्षा पुढं काहीच नीट दिसत नाही, रस्त्यावरच्या गाड्यांचे दिवेही धुक्याच्या पडद्यामागे हरवतायत. तापमान अचानक खाली कोसळल्यामुळे लोकांना घराबाहेर निघतानाच अंगभर ऊबदार कपडे घालावे लागत आहेत.
चक्रीवादळामुळे जरा उबदार हवा परत आली होती, काही भागांत पाऊसही पडला आणि गारठा हलकासा मागे हटल्यासारखा वाटला. पण आता कमजोरीने सुरू झालेला थंड वाऱ्यांचा प्रवाह अचानक जोरात आला आणि संपूर्ण राज्यभर थंडीची पकड मजबूत झाली आहे. हवामान खातं म्हणतंय की डिसेंबरचा संपूर्ण महिना असाच जाणार सकाळ-संध्याकाळ थंड वाऱ्यांमुळे गारवा वाढत जाणार, आणि दिवसा २-३ तास सोडले तर उबदार हवेला फारशी जागा मिळणार नाही.
विदर्भ–मराठवाड्यातील भागांत तर हा गारठा आणखी तीव्र राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी पारा ६ अंशांपर्यंत उतरल्याचं दिसलं होतं, आणि चक्रीवादळामुळे तापमान वर-खाली होत असलं तरी आता थंडीची लाट कायम राहणार हे स्पष्ट होत आहे.
राज्यात गुलाबी थंडीने आपला रंग दाखवला आहे आणि पुढील काही दिवसांत या थंडीत अजून वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं स्पष्ट केली आहे. सकाळच्या वेळी दरवाजे उघडताच येणारा थंड वाऱ्याचा झटका, रस्त्यावर चालताना दाट धुक्याने दिसेनासं झालेलं जग, आणि संध्याकाळी चारनंतरचं अंग गार करणारे वातावरण हा सगळा गारवा आता डिसेंबरभर लोकांना जाणवणार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग माहिती जाणून घेण्यासाठी हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा.)