December Weekly Horoscope | डिसेंबरचा पहिला आठवडा काही दिवसांतच संपतोय… आणि आता सगळ्यांची नजर लागलीय दुसऱ्या आठवड्याकडे! कारण या काळात मोठ्या ग्रहांचं शक्तिशाली राशी परिवर्तन होत आहे. ज्योतिषानुसार, हा आठवडा अनेक राशींचं नशीब अक्षरशः पलटवू शकतो. December Weekly Horoscope
नोकरी, व्यवसाय, आरोग्य, प्रेमसंबंध आणि कुटुंब… या सगळ्यांवर या आठवड्याचे ग्रह परिणाम करणार आहेत.
चला पाहूया 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य – 8 ते 14 डिसेंबर.
♈ मेष (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी आठवडा उत्तम. अंगात नवी ऊर्जा जाणवेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं एकामागोमाग पूर्ण होतील. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता. आर्थिकदृष्ट्या अडचणी दूर होतील आणि अडकलेले पैसे मिळू शकतात.
♉ वृषभ (Taurus Weekly Horoscope)
हा आठवडा धावपळीचा. कामाचा ताण वाढेल आणि थकवा जाणवेल. थोडा आराम केला नाही तर आरोग्य बिघडू शकतं. पण कुटुंबासोबत छान वेळ मिळेल. जोडीदारासोबतचे वाद मिटतील आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल.
♊ मिथुन (Gemini Weekly Horoscope)
चढ-उतार जास्त. आर्थिक ताण जाणवेल. एखादा जुना वाद पुन्हा समोर येऊ शकतो आणि अनावश्यक आरोपांचा सामना करावा लागू शकतो. घरात वातावरण शांत ठेवणं कठीण जाईल. पत्नी आणि मुलांशी मतभेद वाढू शकतात.
♋ कर्क (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी सावधानतेचा आठवडा. बोलताना जपून बोला, नाहितर चांगलं चाललेलं काम बिघडू शकतं. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता जास्त. शांत राहणं हा सर्वोत्तम उपाय.
♌ सिंह (Leo Weekly Horoscope)
हा आठवडा सिंह राशीसाठी शुभ संकेत घेऊन येतोय. तुम्ही ठरवलेलं काम यशस्वी होईल. मित्रांकडून आणि कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकते. घरात एखादी शुभ घटना होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
♍ कन्या (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी हा आठवडा खूप फायदेशीर. नियोजित कामं वेळेत पूर्ण होतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मान वाढेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता. वर्तनात बदल केल्यास मोठा फायदा मिळेल.
♎ तूळ (Libra Weekly Horoscope)
थोड्या अडचणींचा आठवडा. मनात अस्वस्थता वाढेल. कौटुंबिक आयुष्यात मतभेद निर्माण होतील. कुटुंबाशी वेळ काढून शांतपणे चर्चा करणं गरजेचं. एखादा मित्र विश्वासघात करू शकतो, त्यामुळे व्यवसायात सावधगिरी आवश्यक.
♏ वृश्चिक (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आनंद आणणारा. अनेक नवीन कामं हातात येतील आणि मनात आनंद निर्माण होईल. घरी नवीन पाहुण्यांचं आगमन. भविष्यासाठी पैसे साठवण्याची उत्तम संधी.
♐ धनु (Sagittarius Weekly Horoscope)
नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात. नियोजित कामं यशस्वी होतील. मित्रांसोबत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची शक्यता आणि तो यशस्वी होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळेल.
♑ मकर (Capricorn Weekly Horoscope)
खूप शुभ आठवडा. जुने वाद संपतील आणि कोर्टकामात विजय मिळू शकतो. आर्थिक फायदा मोठा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळू शकतो. कुटुंबात आनंद वाढेल. थोड्या छोट्या अडचणी येतील पण त्यांचा मोठा त्रास नाही.
♒ कुंभ (Aquarius Weekly Horoscope)
आर्थिक समस्या त्रास देतील. कर्जाची परतफेड कठीण होईल. काही लोक अनपेक्षितपणे अपमानित करू शकतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वर्चस्व कमी होईल. घरात तणाव राहील पण जोडीदार आणि मुलांचं समर्थन मिळेल.
♓ मीन (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी आशादायी आठवडा. जुन्या समस्यांपासून आराम मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून नवीन नोकरी किंवा संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सामाजिक वागणुकीमुळे फायदा. पत्नीचा साथ मिळेल.