सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण आली मोठी अपडेट समोर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीचं वातावरण होतं, लोकही म्हणत होते की दर रोजच चढतायत आणि आणखी वाढणार. पण आज अचानक रंगच बदलला भाऊ. मुंबई-नवी दिल्लीच्या सराफा बाजारापासून आंतरराष्ट्रीय मार्केटपर्यंत गुंतवणूकदारांनी नफा वसूल करायला सुरुवात करताच सोनं-चांदी गडगडली. चांदी तर तब्बल 2477 रुपयांनी खाली आली, म्हणजे कालच्याच उच्चांकावरून आज थेट पडझड.

जीएसटीशिवाय चांदीचा आजचा दर 1,75,713 रुपये किलोवर स्थिरावला, तर जीएसटीसह 1,80,984 रुपये किलो इतका झाला. सोन्याचाही अंदाज तसाच कालपर्यंत 24 कॅरेट सोनं 1,28,214 रुपयांवर पोहोचलं होतं, पण आज ते 459 रुपयांनी कमी होऊन 1,27,755 रुपयांवर आलं आहे. 22 कॅरेट सोन्याचाही दर खाली येत 1,17,024 रुपयांवर आल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं. 18 कॅरेट सोनंही 345 रुपयांनी स्वस्त होऊन 95,816 रुपयांवर आलं. 23 कॅरेट सोन्यातही घसरण दिसली एका तोळ्याचा दर 127243 रुपयांपर्यंत आला आहे. एकेकाळी 17 ऑक्टोबरला सोन्याने गाठलेला 1,30,874 रुपयांचा उच्चांक लोकांना अजून आठवतो; त्या तुलनेत आजचं सोनं जवळपास 3,119 रुपयांनी स्वस्त मिळतंय म्हणजे सध्याच्या घडीला खरेदी करणाऱ्यांसाठी थोडा दिलासा म्हणायचा. चांदीही 3 डिसेंबरच्या उच्चांकावरून जवळपास 3,000 रुपयांनी खाली आल्यामुळं अनेकांना वाटतंय की आता बाजार थोडा शांत झाला. Gold Price Today

2025 मध्ये सोन्याच्या दरात जी वाढ झाली, ती साधी नव्हती; आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची हालचाल, आणि विविध देशांमधला तणाव या सगळ्यांचा परिणाम थेट भारतातल्या सोन्याच्या दरांवर झाला होता. वर्षाच्या सुरुवातीला सोनं 75,000 रुपये आणि चांदी 86,000 रुपये किलोवर होती, आणि तिथून इतका प्रवास करत दोन्ही धातू आजच्या टप्प्यावर आलेत. चांदीबाबत तर पुरवठा कमी आणि औद्योगिक वापर वाढ या दोन गोष्टींनी तिच्या किमतीत जोरदार उसळी दिली होती. आता मात्र गुंतवणूकदारांनी नफा घेतल्यामुळे बाजार थोडा खाली येताना दिसतोय.

दरम्यान, आयबीजेए (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन) दररोज दोन वेळा सोन्या-चांदीचे अधिकृत दर जाहीर करते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता. हे दर मेकिंग चार्जेसशिवायचे असतात, त्यामुळे प्रत्यक्ष तुमच्या गावात-शहरात तुम्हाला दिसणारा दर थोडा वेगळा असू शकतो. सध्याच्या घडीला बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांनी घाई न करता पुढील काही दिवसांच्या हालचाली पाहूनच निर्णय घ्यावा असं सोनार सांगत आहेत.

Leave a Comment