Ladki Bahin Yojana : जर तुम्ही देखील शासनाच्या सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. बर शासनाचा नवीन निर्णय काय यामध्ये महिलांना काय नवीन फायदे मिळणार आहेत हे एकदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Ladki Bahin Yojana
मध्यप्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेली लाडली बहन योजना च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने या आधारावरती सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महिलांसाठी खूप महत्त्वाचा उपक्रम आणि महिलांसाठी फायदेशीर योजना ठरत आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीची घोषणा केल्यापासून राज्यातील महिलांमध्ये अस्तित्व निर्माण झाले आहे आमचे नोव्हेंबर चे पैसे कधी येणार याची वाट महिला पाहत आहेत. Ladki Bahin Yojana
राज्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका याच्या दोन ते तीन तारखेला होणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महापालिकेचे निवडणुका होतील त्यानंतर मग तिसरा टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूक हणार आहे त्या सर्व पार्श्वभूमी वरती लाडकी बहीण योजनेबाबत वातावरण तापू लागलेले आहे अशातच अनेक राजकीय पक्ष मोठे मोठे आश्वासन देत आहेत याच पार्श्वभूमी वरती सरकारला पुन्हा एकदा त्यांच्या सुरू करण्यात आलेला लाडकी बहीण योजनेबाबत आठवण आलेले आहे.
तरीही योजना सरकारसाठी खूप महत्त्वाची ठरली या योजनेच्याच आधारावरती त्यांनी पुन्हा सरकार स्थापन केलेले आहे त्यामुळे ही योजना महिलांसाठी आणि सरकारसाठी देखील खूप महत्त्वाचे ठरलेले आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आणि हा लाभ महिलांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरित केला जातो.
सर्व पार्श्वभूमी वरती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगस नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये त्यांनी बोलताना म्हणाले की राज्यात तुकडे बंदी कायदा आम्ही हटवला आहे.
आता या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्य सरकार करणार आहे गावोगावी भूमि अभिलेखांची संबंधित अनेक वाद आणि अडचणी दूर करण्याचा हा मोठा पावला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तर याच बाबत पुढे बोलत असताना ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी आणखी भर देण्यात येणार आहे महिला बचत गटांना थेटे एक लाख रुपये अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लघुउद्योग सूक्ष्म व्यवसाय आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे असे ते म्हणाले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे आता महिलांना एक लाख रुपये हे बचत गटांसाठी देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार ?
राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका चालू असल्यामुळे या ठिकाणी रणसंग्राम सुरू आहे अनेक पक्ष सध्या याच निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावीत आहेत. परंतु महिलांमधून एक प्रश्न उपस्थित केला जात आहे आमचा नोव्हेंबर चा हप्ता कधी येणार? तर काही प्रसार माध्यमांच्या अपडेट नुसार महिलांना लवकरच नोव्हेबर हप्ता दिला जाणार आहे परंतु राज्यामध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे शासनाला कुठलाही असा निर्णय घेता येत नाही दोन तारखेला इलेक्शन आणि तीन तारखेला निकाल झाल्यानंतर महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता महिलांच्या खात्यावरती हा हप्ता कधी येतो
हे पण वाचा | ई-केवायसी (e-KYC) न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर ! यादीत नाव पहा