मुंबईकडे निघालेल्यांसाठी खुशखबर! कोल्हापूर–मुंबई स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जाहीर 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway Update | रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी आजची बातमी खरोखर दिलासा देणारी आहे. विशेष म्हणजे, ही माहिती कोल्हापूर–मुंबई मार्गावर रोज प्रवास करणाऱ्यांसाठी अधिकच महत्त्वाची आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मार्गावर प्रचंड गर्दी उसळणार अशीच शक्यता आहे.

या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत रेल्वे प्रशासनाने यंदा आगोदरच हातपाय हलवले आहेत. अनुयायी मुंबईत सहज पोहोचावे, त्यांना त्रास होऊ नये आणि कुणालाच अडचण निर्माण होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देऊन रेल्वेने या स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबेही जाहीर केले आहेत. त्यामुळे आतापासूनच प्रवाशांमध्ये दिलासा आणि समाधानाचं वातावरण दिसत आहे.

वेळापत्रक कसं असणार?

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार 

➡️ कोल्हापूर–मुंबई स्पेशल एक्स्प्रेस

प्रस्थान: 5 डिसेंबर 2025, सायं. 4.40

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर

पोहोच: 6 डिसेंबर, पहाटे 4.00

मुंबई सीएसएमटी

➡️ मुंबई–कोल्हापूर स्पेशल एक्स्प्रेस

प्रस्थान: 6 डिसेंबर, रात्री 10.30

मुंबई सीएसएमटी

पोहोच: 7 डिसेंबर, सकाळी 10.00

कोल्हापूर

🛑 कुठे कुठे थांबणार ही स्पेशल ट्रेन?

ही विशेष एक्स्प्रेस तब्बल १५ महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेणार आहे. त्यामध्ये

हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद जंक्शन, जेजुरी, पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, ठाणे, दादर या सर्व स्थानकांचा समावेश आहे.

प्रवाशांनी नेहमीप्रमाणे धावपळ न करता या स्टेशनांवरून सहज चढ-उतार करता यावा, यासाठी रेल्वेचे सर्व हालचाली व्यवस्थित आखण्यात आल्या आहेत.

 आंबेडकरी अनुयायांसाठी खास दिलासा

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत दाखल होणाऱ्या लाखो अनुयायांसाठी ही स्पेशल गाडी म्हणजे मोठी सोय ठरणार आहे. प्रत्येक वर्षी या मार्गावर प्रचंड गर्दी होते, तिकीट मिळणं कठीण होतं, तर कधी प्लॅटफॉर्मवर गोंधळ उडतो. यंदा मात्र रेल्वेने वेळेआधीच तयारी करून घेतल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षित आणि सहज प्रवासाला अधिक चालना मिळणार आहे.

🔚 शेवटचा मुद्दा – रेल्वेचा हा निर्णय खरंच लोकाभिमुख

सामान्य माणूस, रोजचा प्रवासी, विद्यार्थ्यांपासून ते आंबेडकरी अनुयायांपर्यंत… सगळ्यांच्याच डोक्यावरची गर्दीची चिंता कमी करणारा हा निर्णय आहे. लोकांच्या गरजा समजून घेत रेल्वेने वेळेत पाऊल उचललं, हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची निशाणी.

महापरिनिर्वाण दिनी मुंबई गाठणाऱ्या प्रत्येक अनुयायांसाठी ही स्पेशल ट्रेन म्हणजे सुखद आणि सुरक्षित प्रवासाची खात्रीच.

Leave a Comment