महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2, 5, 6 आणि 7 डिसेंबरला शाळेला असणार सुट्टी? काय आहे कारण जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Schools : डिसेंबर महिना सुरू होताच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहे. कारण अचानक चार दिवस सलग सुट्टी मिळणार असल्याची बातमी काल रात्रीपासून बातम्यांवर, वाड्या-वस्त्यांवर, पालकांच्या WhatsApp ग्रुपमध्ये फिरतेय. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्यासुद्धा चेहऱ्यावर कालपेक्षा वेगळीच चमक दिसली. भाऊ खरंच आहे का? चार दिवस सुट्टी? असा प्रश्न छोट्या-छोट्या मुलांच्या डोळ्यात दिसत होता. आणि याच सगळ्याचा एक एक कारण शोधून काढताना पूर्ण अपडेट आता समोर आलं आहे. Maharashtra Schools

खरं सांगायचं तर डिसेंबर महिना सुरुवातीपासूनच वेगळा असतो. थंडीची सुरुवात, परीक्षांच्या तयारीचा माहोल, आणि मध्येच सण-उत्सव… पण यावेळी विद्यार्थ्यांचं नशीब भारी निघालंय. कारण सलग चार दिवसांची सुट्टी एकत्र मिळणं ही छोटी गोष्ट नाही. विशेषत: ग्रामीण भागात तर मुलं हे दिवस पतंग उडवण्यात, क्रिकेट खेळण्यात किंवा गावच्या यात्रेत फिरण्यात घालवतात.

Maharashtra Schools
Maharashtra Schools

मग या चार सुट्ट्या का? चला एकेक कारण सोप्या भाषेत समजून घेऊया.

दोन डिसेंबर : मतदानामुळे बंद राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे वातावरण तुफान तापलेलं आहे. गावागावात पोस्टर, माईक, प्रचारयात्र आणि अशातच दोन डिसेंबर रोजी मतदानाची तारीख लागल्यामुळे ज्या विभागांत निवडणुका आहेत, तिथली शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मतदानाची केंद्रे बहुतेक शाळांमध्येच उभारली जात असल्याने हा निर्णय अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे उद्या तिथल्या मुलांना सुट्टी मिळणार, हे निश्चित.

पाच डिसेंबर राज्यभर शिक्षकांचा संप  :सध्या राज्यात सर्व शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक ठरवलंय. अनेक शिक्षकांनी याला विरोध दर्शवला आहे. काही राज्ये कोर्टात गेली, पण महाराष्ट्र सरकार अजून कोर्टात गेलेलं नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आणि अखेर 5 डिसेंबर रोजी राज्यभरचा शाळाबंद आंदोलन जाहीर झालं. या दिवशी मोठ्या प्रमाणावर शिक्षक शाळेत येणार नसल्याने विद्यार्थ्यांना बळजबरीने सुट्टी मिळणार हे नक्कीच.

सहा डिसेंबर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : मुंबई आणि उपनगरांमध्ये हा दिवस मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. लाखो लोक दादर चौपाटीला दर्शनासाठी जातात. त्यामुळे वाहतूक, सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था या सगळ्यांवर ताण येतो. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी मिळणार आहे. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी फक्त सुट्टी नसून, इतिहासाशी जोडणारा एक विशेष क्षण असतो.

सात डिसेंबर – रविवार : शेवटी रविवारी शाळा बंद असतातच. पण यावेळी 5 आणि 6 डिसेंबरच्या सुट्ट्यांनंतर हा रविवार आल्याने विद्यार्थ्यांसाठी एकदम ताजेतवाने करणारा लॉंग विकेंड तयार झालाय.  मुलं तर आधीच प्लॅनिंगला लागली  कोण कुठे जाणार, कोण बागेत जाईल, कोण क्रिकेट मॅच खेळणार. एकूणात, हा विकेंड मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरणार आहे.

Leave a Comment