Namo Shetkari Yojana: राज्यातले सगळे शेतकरी भाऊ आजकाल एकच प्रश्न विचारतायत… “नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा म्हणजे ८वा हप्ता कधी खात्यात पडणार?” कारण खरी गोष्ट अशी की, शेतात कष्ट करण्यापेक्षा कधी पैसे येणार याचीच काळजी जास्त वाटते. घरात खत, औषधं, बियाणं, जनावरांचा चारा, रोजच्या खर्चासाठी ही मदत फार मोठी असते. नमो शेतकरी योजना अतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
PM किसानचा २१ वा हप्ता – १९ नोव्हेंबरला
सध्या सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे PM-Kisan योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळाला आहे. याचाच फायदा नमो शेतकरी योजनेलाही मिळतो, कारण ही योजना PM-Kisan पात्र शेतकऱ्यांनाच मिळते. म्हणजे साधं गणित PM-Kisan मिळाला की नमो शेतकरी प्रक्रियेची सुरुवात होते. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्ते मिळाले आहेत. लवकरच या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. Namo Shetkari Yojana
कार्यपद्धती कशी चालते? (सरळ बोलायचं तर)
नमो शेतकरी योजनेचं पैसे लगेच पडत नाहीत, त्यासाठी काही सरकारी पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात—
- पीएम किसानचे पैसे जमा
- केंद्राकडून राज्याला पात्रांची यादी
- राज्य सरकारकडून निधी मंजूर
- नंतर जीआर काढला जातो
आणि याच जीआरनंतर साधारण १० ते १५ दिवसांच्या आत हप्ता खात्यात जमा केला जातो.
८वा हप्ता कधी मिळू शकतो?
सध्याची प्रक्रिया पहाता…
- पीएम किसान – १९ नोव्हेंबर
- प्रक्रिया – १० ते १५ दिवस
म्हणून अंदाजाने नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता डिसेंबरच्या २० तारखेपर्यंत मिळू शकतो. हा सरकारी अधिकृत दिनांक नाही, पण गेल्या हप्त्यांवरून केलेला स्पष्ट अंदाज आहे.
पात्र कोण?
- ज्यांना पीएम किसान मिळतो
- त्यांनाच नमो शेतकरी मिळतो
म्हणजे वेगळं नोंदणी, वेगळा अर्ज असं काही नाही.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
आजकाल शेतातून फार मिळकत निघत नाही, खर्च जास्त आणि उत्पादन कमी… अशा वेळी सरकारकडून येणारा प्रत्येक हप्ता हा खरंच बळ देतो. विशेषतः खरीप संपल्यावर आणि रब्बी सुरुवातीला पैशाची खरी गरज असते. हा हप्ता वेळेवर मिळाला तर घरातल्या छोट्या गरजा पूर्ण होतात. शेतीबरोबरच घर चालवणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
आपण दिवसभर उन्हात कष्ट करतो, मातीत श्रम घालवतो, त्याची किंमत कधी दिली गेलीच नाही… पण या छोट्या छोट्या मदतीलाही आपल्याला आधार बनवून पुढं जायचं आहे. डोळ्यात आशा, मनात विश्वास आणि शेतीवर पूर्ण प्रेम ठेवून पुढचा दिवस जगायचा… हप्ते येतील, पण आपण धीर सोडायचा नाही. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण कधी कधी माहितीच मदत होते.