मुंबई पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी मोठी बातमी! ही एक्सप्रेस आज झाली रद्द, जाणून घ्या नवीन अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway News : मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारसा सोपा नसणार, कारण पहाटेपासूनच रेल्वे स्थानकांवर लोकांची लगबग, गोंधळ, आणि कुणाच्यातरी चेहऱ्यावरची चिंता दिसत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणावर अनुयायी आले होते, आणि आता परतीची वेळ जवळ आली तरी लोणावळा यार्डमध्ये सुरू असलेल्या १६ तासांच्या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांचा प्रवास आज अक्षरशः अडकणार असल्याचं चित्र तयार झालं आहे. सामान्य माणूस, नोकरी करणारे, विद्यार्थ्यांपासून ते मुंबई-पुणे रोजंदारी करणारे लोक या सर्व जणांना आजच्या ब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे. Railway News

लोणावळा यार्डमध्ये मार्गांच्या पुनर्रचनेचं मोठं काम सुरू असल्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येत आहे. मध्यरात्रीनंतर २.१५ पासून सुरू झालेला हा ब्लॉक सायंकाळी ६.१५ पर्यंत चालणार आहे आणि यामुळे सिंहगड, प्रगती, इंटरसिटी, डेक्कन क्वीनसारख्या अनेक लोकप्रिय गाड्या आज पूर्णपणे रद्द झाल्या आहेत. या गाड्या नुसत्या रद्द झाल्या असं नाही, तर हजारो प्रवाशांचे नियोजित प्लॅन, कामे, अपॉइंटमेंट्स, घाईगडबडीची कामं यावर थेट परिणाम होतोय. मुंबई–पुणे हा मार्ग तसा कुठल्याही दिवशी मोकळा नसतो; तिथे आजच्या ब्लॉकमुळे गोंधळ आणखीच वाढलेला दिसत आहे.

मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या १० गाड्या आज पूर्ण दिवस रद्द राहणार असून इतरही २० हून अधिक मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम दिसणार आहे. डेक्कन क्वीनसारख्या गाडीसाठी रोज प्रतीक्षा करणारे नियमित प्रवासी आज सकाळपासून स्टेशनवर जाऊन रिकाम्या फलाटाकडे बघत परत फिरताना दिसले. कुणी टॅक्सीच्या शोधात, तर कुणी बसस्टॉपवर गर्दीत उभं राहून पर्यायी व्यवस्था बघत आहे. काहींच्या चेहऱ्यावर नाराजी आहे तर काहीजण परिस्थिती समजून घेत शांतपणे घरी परतताना दिसतात.

याशिवाय पनवेलमध्येही आजपासून चार दिवस रात्रकालीन ब्लॉक सुरू होत असल्याने तिकडून धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळेत विलंब होणार आहे. पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्समधील कामे करायची असल्याने हा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे आणि रात्रौ १.३० ते ३.३० या वेळेत अप-डाउन मेल आणि कर्जतच्या मार्गिकांवरही परिणाम होणार आहे. काही गाड्या दोन–तीन तास उशिराने धावतील, तर काहींच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत.

प्रवाशी मात्र गोंधळात सापडले आहेत. आज पुण्याला मुलाखत होती आज डॉक्टरी तपासणी ठरलेली होती

कार्यालयात महत्वाची मिटिंग होती अशा कितीतरी लोकांच्या व्यथा स्टेशन परिसरात ऐकू आल्या. पण रेल्वे प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कामे सुरू राहतील आणि काही दिवसांचा त्रास सहन करून पुढील काळात मार्गव्यवस्था अधिक सुरळीत होईल, असा विश्वास ते देत आहेत.

एकूणच, मुंबई–पुणे मार्गावर आजचा दिवस प्रवाशांसाठी खडतर ठरतो आहे. ज्यांना अत्यावश्यक काम नाही त्यांनी शक्य असल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. आणि जे प्रवास करण्यासाठी मजबूर आहेत, त्यांनी रेल्वेचे अधिकृत अपडेट्स सतत तपासत राहावे, कारण गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होत राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment