रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत मिळणार साखर आणि या वस्तू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Latest News | दीड वर्षांपासून साखरेचा गोडवा हरवलेल्या हजारो अंत्योदय कार्डधारकांसाठी अखेर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साधं घर, साधं जीवन, महिन्याचा हिशोब जुळवत जगणाऱ्या कुटुंबांसाठी साखर हा केवळ पदार्थ नसतो… तर सण-उत्सवातील गोडवा असतो. पण टेंडरअभावी गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानात साखर मिळणं पूर्णपणे बंद झालं होतं. घरात दिवाळी आली, लग्नसराई आली… पण अनेक गरीब कुटुंबांच्या घरात गोड पदार्थांचा सुगंधच उठला नाही.

मात्र आता परिस्थिती बदलतेय. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या तीन महिन्यांची साखर उपलब्ध झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागालाही एका महिन्याचा साखरेचा साठा प्राप्त झाला असून काही ठिकाणी वाटप सुरूही झाले आहे.

अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डाला प्रतिमहिना १ किलो साखर दिली जाणार आहे. सध्या बाजारात साखरेचा भाव ४४ ते ४५ रुपयांच्या दरम्यान असताना रेशन दुकानातून हीच साखर फक्त २० रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबाचा थोडातरी खर्च कमी होऊन घरात गोडवा परतणार आहे.

शासनस्तरावर टेंडर न निघाल्यामुळे रेशनद्वारे साखरपुरवठा थांबला होता. परिणामी ८७,०६४ अंत्योदय कार्डधारकांना या त्रासाचा मोठा फटका बसला होता. जिल्हा पुरवठा विभागानं वारंवार शासनाकडे मागणी पाठवल्यानंतर अखेर पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आणि गोदामात साखर येऊन पोहोचली आहे.

आगामी काही दिवसांत सर्व रेशन दुकाने गोडव्यानं भरून जाणार आहेत. नववर्ष जवळ आलंय आणि अशा वेळी गरीब कुटुंबांच्या घरात गोड पदार्थाची चव परत येणं… हा छोटासा का होईना, पण मनाला दिलासा देणारा आनंदच.

Leave a Comment