Ration Card News :राज्यातल्या लाखो रेशनधारकांसाठी आजची ही बातमी म्हणजे एकप्रकारे मोठा दिलासा आहे भाऊ. कारण इतक्या वर्षांपासून जेव्हा जेव्हा रेशन दुकानात जाणं, लाईनीत उभं राहणं, दुकानदार काय सांगतोय त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता… कधी धान्य कमी दिलं, कधी “आज स्टॉक नाही” म्हणत परत पाठवलं, तर कधी यादीत नावच नाही असं सांगितलं. हा त्रास प्रत्येक गरीब माणसाला माहिती आहे. पण आता पुरवठा विभागाने अशी एक नवीन सोय सुरू केली आहे की येत्या काळात रेशन दुकानदारांची मनमानी जवळपास बंदच होणार आहे असं लोकांना वाटतंय. Ration Card News
नोव्हेंबरपासून सरकारने एक नवी एसएमएस सेवा सुरू केली आहे आणि हे ऐकून अनेक नागरिक तर आश्चर्यचकितच झालेत की “अरे, आता रेशन दुकानात जायच्या आधीच आपल्याला आपलं धान्य किती मिळणार, कोणतं मिळणार, कोणत्या महिन्याचं मिळणार… हे सगळं मोबाईलवरून कळणार?” आतापर्यंत धान्य मिळणार की नाही हे लोकांना दुकानात गेल्यावरच कळायचं. पण आता फोनवर मॅसेज येणार म्हणजे दुकानात गेल्यावर कोणी मनमानी करू शकणार नाही.
“आता तरी तो दुकानदार ‘धान्य संपलं’ असं सांगून परत पाठवणार नाही. आपल्या मोबाईलवर आधीच लिहिलेलं असेल ना… किती किलो गहू, किती तांदूळ, किती बाजरी.” शहरातही अनेकांनी सांगितलं की पहाटेपासून रांगेत उभं राहून शेवटी दुकानातून निराश परत जाण्याची वेळ कमी होईल. कारण आता धान्य वितरित होण्याच्या आधीच एसएमएस येणार आहे हा मोठाच बदल आहे.
या मॅसेजमध्ये फक्त धान्याच्या प्रकाराची आणि प्रमाणाचीच माहिती राहत नाही, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत किती धान्य मंजूर आहे आणि किती प्रत्यक्ष दिलं जातंय याची नोंदही असते. म्हणजे एकप्रकारे सरकारने धान्य वितरणावर इलेक्ट्रॉनिक नजर ठेवण्याची सोय केली आहे. ज्यामुळे रेशनमध्ये नेहमी चालणारी कपात, रिकामं दाखवणं, यादीतून नाव वगळण हे प्रकार सरळ सरळ पकडले जातील.
आता पुरवठा विभागाने तक्रारींसाठी दोन टोल-फ्री क्रमांकही दिलेत – १८००-२२२-४९५० आणि १९६७. कुणाला धान्य कमी मिळालं, संशयास्पद व्यवहार दिसला, किंवा मॅसेज आला नाही तर थेट कॉल करू शकतात. अनेक जण तिथं फोनही करतायत आणि तक्रारीवर लगेच कारवाई होत असल्याचं लोक सांगताहेत.
मोबाईल नंबर लिंक नसलेल्यांना मात्र दुकानात जाऊन क्रमांक अपडेट करावा लागेल. कारण एसएमएस फक्त रेशनकार्डाशी जोडलेल्या नंबरवरच येतो. काहींना चुकीचे मॅसेज आलेत, काहींना उशिरा आलेत, पण विभाग म्हणतोय अजून थोडे दिवसात ही प्रणाली अगदी चोख होईल.
ही नवी व्यवस्था पूर्णपणे सुरू झाल्यावर रेशन दुकानांतील अनियमितता मोठ्या प्रमाणात कमी होणार, लोकांचा विश्वास वाढणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरीब माणसाला त्याचा हक्काचं धान्य वेळेवर, पूर्ण मिळणार एवढी तरी खात्री लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.