School Holiday December | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आजपासून डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना मजामस्ती करता यावी अशा चार मोठ्या सुट्ट्या मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. साधारणपणे विद्यार्थी सुट्टीचं नाव जरी ऐकले तरी डोळ्यांत आनंद चमकतो आणि डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तर त्यांच्यासाठी लॉंग विकेंडची मेजवानीच आहे!
राज्यात 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर रोजी शाळा महाविद्यालयं आणि काही सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत. पण या सलग सुट्ट्यांमागचं कारण काय? चला, एकेक दिवसाचं अपडेट अगदी सोप्या भाषेत पाहूया.
२ डिसेंबर २०२५ – मतदानाचा दिवस
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे. उद्या म्हणजे २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित मतदारसंघातील शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे उद्याचा दिवस अधिकृत सुट्टी!
५ डिसेंबर – शिक्षकांचा संप, विद्यार्थ्यांना सुट्टी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण देशभरातील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केलं आहे. अनेक राज्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली असताना महाराष्ट्र सरकारने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.
यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून ५ डिसेंबर रोजी मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली संप पुकारला आहे. संपाच्या दिवशी शिकवणी बंद असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा एक सुट्टी मिळणार आहे.
६ डिसेंबर – महापरिनिर्वाण दिन (मुंबई व उपनगरात सुट्टी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर व उपनगरातील सर्व शाळा, महाविद्यालयं तसेच शासकीय–निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम, यात्रेची गर्दी असल्याने प्रशासनाने सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
७ डिसेंबर – रविवार
आणि हो… रविवार तर ठरलेलाच!
५, ६ आणि ७ डिसेंबर असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना थेट लॉंग विकेंडची जबरदस्त संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी धमाल आठवडा
डिसेंबरची थंडी, सणासुदीचा माहोल, आणि त्यात सलग चार सुट्ट्या… विद्यार्थ्यांसाठी यापेक्षा मजेदार सुरुवात असूच शकत नाही. तर पालक मात्र मुलांच्या अभ्यासाचं काय होणार याची चिंता करताना दिसतील! तरीही, सुट्टी म्हणजे फक्त खेळ–मस्ती नाही… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचीही ही एक सुंदर संधी आहे.