डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय भाव मिळणार? आली मोठी अपडेट समोर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market : सोयाबीनचा हंगाम सुरू झालाय, आणि मागचा महिना भर शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता या वर्षी तरी सोयाबीनला बरा भाव मिळेल का? कारण पावसाचं टायमिंग, उत्पादनातली घसरण आणि जागतिक बाजारातले बदल या सगळ्यामुळे शेतकरी थोडा चिंतेतच आहे. बाजारात आवक वाढायला लागली की दर खाली यायची भीती कायमच… म्हणूनच डिसेंबर महिन्यात काय चित्र दिसेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे. Soybean Market

हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे भाव कधी वर गेले, कधी खाली जणू रोजची वेगळीच गोष्ट. विजयादशमीपासून आवक सुरू झाली असून गेल्या काही दिवसांत तर बाजारांमध्ये सोयाबीनचा ओघ एकदम वाढलाय. पुढचे काही दिवस ही आवक अजून वाढणार आहे, असं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे दरांमध्ये गोंधळ उडणं स्वाभाविकच आहे.

या वर्षीचं उत्पादन साधारण २१ टक्क्यांनी कमी राहणार, असं सुरुवातीपासून बोललं जात होतं. जागतिक स्तरावरही उत्पादनात जवळपास ०.३ टक्क्यांची घट दाखवली गेलीय. म्हणून शेतकऱ्यांना वाटत होतं की, “भाव चांगला मिळाला पाहिजे रे यंदा.” पण बाजाराने मात्र आतापर्यंत निराशाच केली आहे. अपेक्षेपेक्षा दर कमीच आहेत आणि त्यामुळे शेतकरी नाराजही आहे.

आता प्रश्न असा उभा राहतो की डिसेंबर २०२५ मध्ये सोयाबीनचा सरासरी भाव किती असणार?

गेल्या तीन वर्षांचा इतिहास पाहिला तर

२०२४ चा डिसेंबर: साधारण ४१४३ रु./क्विंटल

२०२३ चा डिसेंबर: जवळपास ४८३१ रु./क्विंटल

२०२२ चा डिसेंबर: सर्वाधिक ५५५६ रु./क्विंटल हा दर आजही शेतकरी आठवून बोलतात.

बाजारातील ही रोलर-कोस्टर सगळ्यांच्या लक्षातच आहे. त्यामुळे यावर्षी कोणत्या मर्यादेत दर मिळू शकतात, या अंदाजाकडे सर्वांचं लक्ष आहे.

स्मार्ट प्रकल्प (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन) यांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, डिसेंबर २०२५ महिन्यात सोयाबीनला साधारण

४,५१५ ते ४,८१५ रुपये प्रति क्विंटल

असा सरासरी दर मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. हे दर FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी अपेक्षित आहेत.

म्हणजे भाव फार उंच जाण्याची चिन्हं नाहीत, पण अचानक मोठी घसरणही दिसणार नाही असं वाटतंय. आवक किती वाढते, हवामानाचा काय परिणाम होतो आणि जागतिक बाजार कुठे झुकतो यावर पुढच्या दिवसांतला नेमका प्रवाह ठरेल.

शेतकऱ्यांनी मात्र बाजारावर लक्ष ठेवून, घाईत विक्री न करता, स्थिर भावाची वाट पाहून निर्णय घेतला तर बरं होईल अशी सूचनाही अनेक तज्ञ देत आहेत.

हे पण वाचा |

Leave a Comment