Namo Shetkari Yojana 2025: सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८व्या हप्त्याबाबत मोठी चर्चा तापली आहे. कारण अलीकडेच पीएम किसानचा २१वा हप्ता वितरित झाला आणि त्यात राज्यातील तब्बल सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे दिसलीच नाहीत. सोशल मीडियावर यामुळे अशी हवा तयार झाली की आता या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यातूनही वगळलं जाणार. काही ठिकाणी तर थेट नाव कापलं गेलं अशा अफवा पसरू लागल्या. त्यामुळे अनेकांच्या मनात चिंता दाटून आली होती की आतापर्यंत मिळालेली मदत थांबणार तर नाही ना. पण याच सगळ्या चर्चेला पूर्णविराम देणारी प्रत्यक्ष माहिती कृषी विभागाकडून पुढे आली आहे. Namo Shetkari Yojana 2025
पीएम किसानचा २१वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला. ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १८,००० कोटी रुपये जमा झाले, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. मात्र महाराष्ट्रात यावेळी लाभार्थ्यांची संख्या कमी दिसली. राज्यातील आकडेवारी पाहिली तर या हप्त्यासाठी ९०,४१,२४१ शेतकरी पात्र ठरले, परंतु काही विसंगतींमुळे सुमारे सहा लाख शेतकऱ्यांची नावे यादीत आली नाहीत. याच कारणामुळे चर्चा अजूनच वाढली.
ही नावे वगळली का गेली, याची कारणं कृषी विभागाने स्पष्ट केली. पात्रतेची तपासणी करताना काही गोष्टी आढळल्या एखाद्या शेतकऱ्याने चुकून किंवा माहिती नसताना दुसऱ्या कोणत्या योजनेतूनही समान लाभ घेतलेला दिसला, काही नावे मृत व्यक्तींच्या यादीतच राहिली, काहींच्या जमीन नोंद आणि खात्याच्या माहितीमध्ये विसंगती दिसली, तर काहींचे आधार-बँक लिंकिंग नीट झालेलं नव्हतं. या गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात नावे मागे पडण्याचं कारण ठरल्या, हे विभागाने सांगितलं.
परंतु मोठा प्रश्न इथेच होता पीएम किसानमधून ज्यांची नावे दिसली नाहीत, त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यातूनही वगळलं जाणार का?
यावर विभागाने स्पष्टपणे सांगितलं की नमो योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या बदलणार नाही. या योजनेच्या आठव्या हप्त्यासाठीही तेच ९०,४१,२४१ शेतकरी पात्र राहतील. म्हणजेच पीएम किसानच्या यादीत नाव नसणं म्हणजे नमो योजनेतून वगळलं जाणं नाही. हे दोन्ही निर्णय स्वतंत्र तपासणीतून घेतले जातात, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. Namo Shetkari Yojana 2025
आता पुढचा मुद्दा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार?
अधिकृत तारीख सरकारकडून अद्याप जाहीर नाही, पण प्राथमिक माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरपर्यंत हा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली उत्सुकता अजून वाढली आहे, कारण हप्ता नियमित वेळेत मिळत राहतोय, फक्त सोशल मीडियावर फिरणाऱ्या दाव्यांनी गोंधळ वाढवला होता.
तर सध्या पसरत असलेल्या विविध अफवांमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही. विभागाकडून आलेल्या आकडेवारीतून हे एकदम स्पष्ट होतं की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेतून कोणालाही वगळलं जाणार नाही. फक्त आपल्या नावाशी संबंधित नोंदी जमीन, आधार लिंकिंग, बँक तपशील नीट अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ते वेळेवर मिळत राहतील.
(Disclaimer: शेतकरी बांधवांना वरील दिलेली बातमी ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे नमो शेतकरी योजनेबाबत आम्ही कुठलीही अफवा पसरवीत नाहीत.)