Gold Price Today: देशात महागाईचे वारे आधीच जोरात वाहत असताना आता सराफा बाजारानेही सर्वसामान्यांची परीक्षा पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत चढ-उतार करत आहेत. कधी भावात थोडीशी घट दिसते, तर दुसऱ्या दिवशी आकडा परत गगनाला भिडतो. आज ३ डिसेंबर २०२५, बुधवारी बाजार उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दागिने खरेदी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांना हा आकडा पाहून अक्षरशः धक्का बसल्याशिवाय राहिलेला नाही.
देशातील आजचे सोन्याचे-चांदीचे दर: (03 December 2025)
बुलियन मार्केटनुसार, आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा (10 ग्रॅम) दर ₹1,30,930 इतका नोंदवला गेला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹1,20,019 आहे. म्हणजेच दिवाळीपासून सुरू झालेली ही ‘सुवर्णवाढ’ अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. याशिवाय चांदीतही बदल दिसून आला आहे. आज १ किलो चांदीचा भाव ₹1,84,380, तर 10 ग्रॅमचा दर ₹1,844 आहे. सोने-चांदी दोन्हीच्या किंमतींनी सर्वसामान्य ग्राहकांना विचारात पाडलं आहे. Gold Price Today
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर
भारतात दागिन्यांचे दर राज्य कर, उत्पादन शुल्क आणि ज्वेलरनुसार बदलत असल्याने प्रत्यक्ष खरेदी करताना किंमत वेगळी असू शकते. तरीही प्रमुख शहरांतील आजचे सूचक दर खालीलप्रमाणे:
| शहर | 22 कॅरेट (10 ग्रॅम) | 24 कॅरेट (10 ग्रॅम) |
|---|---|---|
| मुंबई | ₹1,19,799 | ₹1,30,690 |
| पुणे | ₹1,19,799 | ₹1,30,690 |
| नागपूर | — | ₹1,30,690 |
| नाशिक | — | ₹1,30,690 |
(वरील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक सराफाशी नक्की चौकशी करा.)
२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोनं: फरक काय?
दागिने खरेदी करताना सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “२२ कॅरेट की २४ कॅरेट?” खरं तर दोन्हीमधील फरक समजून घेतल्याशिवाय सोनं खरेदी करणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं आहे.
- २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते आणि त्याची शुद्धता ९९.९% असते.
- मात्र शुद्ध सोनं मऊ असल्याने त्यातून दागिने तयार करता येत नाहीत.
- त्यामुळे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने वापरलं जातं ज्यात अंदाजे ९१% सोने आणि ९% इतर धातू (तांबे, चांदी, जस्त) मिसळलेले असतात.
म्हणजेच दागिन्यांसाठी २२ कॅरेट हा सर्वोत्तम पर्याय, तर नाणी आणि गुंतवणुकीसाठी लोक २४ कॅरेटची निवड करतात.
ग्राहकांचा ‘महागाईचा दिवस’ कधी संपणार?
लग्नाचा हंगाम जवळ येत असताना सोन्याचे दर वाढले की घराघरातच चिंता वाढते. ज्या भावावर कधी आई-वडील दागिने खरेदी करायचे, त्याच भावाजवळ आज १० ग्रॅम सोने पोहोचलं आहे! सराफा बाजारातील ही सतत वाढती चढण सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण निर्माण करत आहे. पुढच्या काही दिवसांत सोनं आणखी महागणार की किंमती खाली येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सध्यातरी ‘सोन्याचा दिवस’ मुळीच दिसत नाही… मात्र सोन्याची झळ मात्र सामान्यांना नक्कीच बसत आहे!